भारताच्या ‘ मंगळयान ‘ला मंगळ ग्रहाभोवती आज बरोब्बर ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. ५ नोव्हेंबर २०१३ ला मंगळयान हे इस्त्रोने प्रक्षेपित केले होते, जवळपास १० महिन्यांचा प्रवास पुर्ण करत आजच्या दिवशी सकाळी ८ च्या सुमारास २०१४ ला मंगळयानाने मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीरीत्या प्रवेश केला. इस्त्रोने खरं तर या मोहीमेचे फक्त सहा महिन्यांसाठी नियोजन केले होते. सहा महिन्यांनंतर मंगळयानमधील सर्व उपकरणे व्यवस्थित काम करत असल्याने आणि यानामध्ये इंधन बाकी असल्याने मोहिमेचा कालावधी वाढवण्यात आला होता. त्यानंतर वेळोवेळी आढावा घेत मंगळयान मोहिमेला extension देण्यात आले. असं करत मंगळयानाने आज ७ वर्षाचाही टप्पा गाठला आहे.


आजही मंगळयान सुस्थितीत असल्याने आणि यानामध्ये काही इंधन बाकी असल्याने आणखी पुढील काही वर्षे मंगळयान हे मंगळ ग्रहाभोवती भ्रमण करू शकणार आहे. त्यामुळे मंगळ ग्रहाचा अभ्यास यापुढेही सुरु रहाणार आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाभोवती पोहचणारा जगातील पहिला देश म्हणून भारताच्या मंगळयान मोहिमेचे याआधीच जगभरात भरपूर कौतुक झाले आहे.

peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
surya grahan 2024
५४ वर्षांनंतर लागणार पूर्ण सुर्यग्रहण! या ३ राशींचे नशीब चमकणार; करिअरमध्ये होईल प्रगती, कमावतील भरपूर पैसा
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)


सध्या मंगळयान हे मंगळ ग्रहाभोवती सुमारे ४२० ते ७७,०००  किलोमीटर अशा लंब वर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. २०१८ ला इस्रोने मंगळयानाने मंगळ ग्रहाच्या घेतलेल्या छायाचित्रांच्या माध्यमातून मंगळ ग्रहाचा Mars Atlas प्रकाशित केला, मंगळ ग्रहाच्या वातावरणाबद्दल काही निष्कर्ष जाहीर केले होते. 


मंगळयान मोहिमेला ७ वर्ष पुर्ण झाल्याची दखल नासानेही घेतली आहे.


चांद्रयान – ३ मोहिम आणि समानवी अवकाश मोहिमेची ( गगनयान ) तयारी इस्त्रो युद्धपातळीवर करत आहे. असं असतांना मंगळ ग्रहाच्या पुढील मोहिमेबद्दल, मंगळयान -२ मोहिमेबद्द्ल कोणती घोषणा करणार याची उत्सुकता आहे. तसंच आज ७ वर्ष पुर्ण होत असल्याच्या निमित्ताने मंगळयान मोहिमेबद्दल कोणते नवे निष्कर्ष इस्त्रो जाहीर करणार याकडेही लक्ष लागून राहिलेले आहे.