भारताचे मंगळयान येत्या १५ दिवसांसाठी संपर्क क्षेत्राबाहेर जाणार आहे. या काळात यानाशी पृथ्वीवरून कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकणार. यान पूर्णपणे स्वयंचलित यंत्रणेवर काम करेल.
पृथ्वी आणि मंगळ यांच्यामध्ये सूर्य येत असल्याने ८ जून ते २२ जून या काळात मंगळयानाशी पृथ्वीवरून संपर्क होऊ शकणार नाही. तसेच मंगळयानही पृथ्वीवर संदेश पाठवू शकणार नाही. या काळात अगोदरच देऊन ठेवलेल्या आज्ञाप्रणालीवर यान काम करेल. त्यासाठी पूर्वतयारी केली असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) सूत्रांनी सांगितले.  गेल्या मार्च महिन्यात अधिक इंधनाची सोय झाल्याने मंगळयानाचे आयुष्यमान सहा महिन्यांनी वाढवण्यात आले होते. यानंतर जर असेच आयुर्मान वाढवणे शक्य झाले तर पुढील मे महिन्यात मंगळयान पुन्हा असेच संपर्क क्षेत्राबाहेर जाईल. तेव्हा सूर्य आणि मंगळामध्ये पृथ्वी आलेली असेल.