‘इस प्यार को क्या नाम दूँ’ फेम अभिनेत्री संगीता श्रीवास्तव यांचे निधन

२५ ऑगस्ट रोजी कोकिलाबेन रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री संगीता श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. २५ ऑगस्ट रोजी कोकिलाबेन रुग्णालयात संगीता यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याचे वृत्त ‘टेलीचक्कर’ने दिले आहे. संगीता यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

काही रिपोर्टनुसार, संगीता यांना गेल्या काही दिवसांपासून vasculitis चा त्रास होत होता. काल २५ ऑगस्ट रोजी अखेर त्यांचे निधन झाले. संगीता यांनी ‘थपकी प्यार की’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ आणि ‘भंवर’ या मालिकांमध्ये काम केले होते.

 

View this post on Instagram

 

In the end, it’s not the years in your life that count. It’s the life in your years. Abraham Lincoln

A post shared by Sangeeta Shrivastava (@sangeetashrivastava) on

यापूर्वी ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ मालिकेतील को-स्टार समीर शर्माने मुंबईतील मालाड इथल्या राहत्या घरी आत्महत्या केली. ४४ वर्षीय समीरने गळफास घेऊन आत्महत्या केली. समीरच्या घरातून कोणतीच सुसाइट नोट मिळालेली नाही. ‘ज्योती’, ‘कहानी घर घर की’, ‘लेफ्ट राइट लेफ्ट’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकांमध्ये समीरने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Iss pyaar ko kya naam doon actress sangeeta srivastava passed away avb

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या