Hyderabad IT Engineer Woman Suicide : तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथील मियापूर परिसरात शुक्रवारी मन सुन्न करणारी घटना घडली. आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका ३७ वर्षीय महिलेने आपल्या सहा महिन्यांच्या बाळासह इमारतीच्या बाळासह इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेतली. या घटनेत महिला जागीच ठार झाली असून तिचे बाळ किरकोळ दुखापतींसह चमत्कारिकरीत्या बचावले. ईशा साहू असे मृत महिलेचे नाव असून तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट आहे. याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत ईशा साहू मियापूर येथील मयुरी नगरमधील परिसरातल्या लक्ष्मी प्रेस्टिज अपार्टमेंट्समध्ये राहत होत्या. शुक्रवारी त्यांनी आपल्या सहा महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन इमारतीच्या सहाव्या मजल्यावर थेट उघडी घेतली. मात्र, कोसळत असताना हवेच्या वेगामुळे त्यांच्या हातातून बाळ निसटले आणि काही अंतरावर जाऊन पडले. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी ईशा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या. त्यांच्या काही अंतरावरच सहा महिन्यांचे बाळही पडले होते.
सुदैवाने या घटनेत त्याच्या हाताला आणि पायाला किरकोळ दुखापत झाली होती. त्यानंतर नागरिकांनी बाळाला तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. बाळाची प्रकृती पूर्णपणे धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. याबाबत एका प्रत्यक्षदर्शी महिलेने पोलिसांना सांगितले की, शुक्रवारी दुपारच्या सुमारास ईशा आपल्या घराच्या बाल्कनीत उभ्या होत्या आणि त्यांच्या कडेवर सहा महिन्यांचे बाळही होते. मात्र, अचानक त्यांनी बाल्कनीतून खाली उडी घेतली. त्याचवेळी कवेत असलेले सहा महिन्यांचे त्यांच्या हातातून निसटले आणि इमारतीच्या खाली असलेल्या कागदांच्या बॉक्सवर कोसळले. या घटनेत ईशा यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुदैवाने बाळाचे प्राण वाचले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या आयटी इंजिनिअर असलेल्या ईशा गेल्या काही महिन्यांपासून निद्रानाश यासारख्या झोपेशी संबंधित गंभीर समस्येचा सामना करत होत्या. सततच्या अपुऱ्या झोपेमुळे त्यांना तीव्र मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले असावे, असा संशय तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून त्याचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या दुर्दैवी घटनेमागील नेमका घटनाक्रम काय होता, याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाच्या सर्व संभाव्य बाजू तपासून पाहत असून कुटुंबातील सदस्य आणि या केसशी संबंधित इतर लोकांकडून माहिती गोळा करत असल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, तपास पूर्ण होऊन अधिकृत निष्प निष्कर्ष समोर येत नाही, तोपर्यंत नागरिकांनी कोणत्याही निष्कर्ष लावू नये किंवा अफवा पसरवू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
