ओडिशातल्या बालासोर या ठिकाणी झालेल्या अपघातात २६१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० प्रवाशांचा मृत्यू झाला. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. दोन ट्रेन्स आणि मालगाडीची धडक यांचा अपघात झाला. या अपघातात सुब्रतो पाल, देबोश्री पाल आणि त्यांचा मुलगा असे तिघेजण या अपघातातून बचावले आहेत.
पाल कुटुंब हे मलुबासन गावातले राहणारे आहेत. हे गाव पश्चिम बंगालमधलं आहे. या तिघांनी इतक्या भयंकर अपघातातून आपण वाचलो म्हणून देवाचे आभार मानले आहेत. आम्ही आमच्या मुलाला डॉक्टरांकडे घेऊन जात होतो. मात्र त्याआधीच हा अपघात बालासोरमध्ये झाला. सुब्रतो पाल यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलं आहे की आम्ही चेन्नईहून आम्ही खरगपूर स्टेशनवर गाडीमध्ये बसलो. बालासोर स्टेशन गेलं आणि एक मोठा झटका बसला त्यानंतर एक मोठा धूर झाला.. त्यापुढे काहीही दिसलं नाही. आम्ही या अपघातातून कसेबसे बचावलो आहोत. काही स्थानिक लोक आले त्यांनी आम्हाला ओढून बाहेर काढलं. त्यामुळे आम्ही वाचलो. नाहीतर काही खरं नव्हतं. देवच आमच्या मदतीला आला आणि आम्ही वाचलो. असंही त्यांनी सांगितलं आहे.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.