दोन भारतीय मच्छिमारांची हत्या केल्याचा आरोप असणाऱ्या इटालियन खलाशांच्या चौकशीसाठी विशेष कोर्ट स्थापन करण्याचा आदेश दिला. हे प्रकरण भारतीय न्यायवस्थेच्या कक्षेत येत नसल्याचा इटालीचा दावा फेटाळून सर्वोच्च न्यायालयाने वरील निकाला दिला आहे.
या प्रकरणाची चौकशी  केरळ सरकारच्या कार्यकक्षेत येत नसल्यान केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या मख्य न्यायाधिशांशी चर्चा करून विशेष कोर्ट स्थापन करण्याचा आदेश सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिला आहे. मच्छिमारीसाठी गेलेल्या दोन केरळी मच्छिमारांवर गोळीबार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप या दोन्ही इटालियन खलाशांवर आहे.