scorecardresearch

Premium

इटलीच्या पंतप्रधान मेलोनींनी मोदींबरोबरचा सेल्फी केला शेअर, पोस्टमध्ये #Melodi लिहित म्हणाल्या…

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडियावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरचा एक सेल्फी शेअर केला आहे.

pm modi and pm meloni
फोटो सौजन्य-एक्स/पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरचा एक सेल्फी शेअर केला आहे. त्यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) सेल्फी शेअर करताना #Melodi असा हॅशटॅग वापरला आहे. तसेच त्यांनी कॅप्शनमध्ये “सीओपी-२८मधील चांगले मित्र” असं लिहिलं आहे. या सेल्फीमध्ये पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान मेलोनी हसताना दिसत आहेत.

पीएम मेलोनी यांनी शेअर केलेला हा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांकडून यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. मेलोनी यांनी पोस्टमध्ये वापरलेल्या हॅशटॅगवरून सोशल मीडियावर विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. Meloni आणि Modi असे दोन शब्द एकत्रित करत इटलीच्या पंतप्रधानांनी Melodi असा हॅशटॅग वापरला आहे.

maldives parliament fight
Video : मालदीवच्या संसदेत खासदारांमध्ये हाणामारी; राष्ट्राध्यक्ष मुइज्जूच्या पक्षाची दादागिरी
jaylalita tn
…जेव्हा जयललिता यांनी दागिने न घालण्याचा केला होता संकल्प; जे. जयललिता यांच्या दगिन्यांचा २५ वर्षांचा इतिहास
Student organizations protest against Governor Arif Mohammad Khan in Kerala
केरळच्या राज्यपालांचे रस्त्यावरच दोन तास ठाण; ‘एसएफआय’च्या निदर्शनांनंतर केंद्राकडून झेड सुरक्षा
Donald Trump wins in New Hampshire primary
न्यू हॅम्पशायर ‘प्रायमरी’मध्ये ट्रम्प विजयी

संयुक्त अरब अमिराती येथे नुकतंच ‘वर्ल्ड क्लायमेट अॅक्शन समिट’चं (सीओपी-२८ समिट) आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही उपस्थित होते. यावेळी मलोनी यांनी मोदींबरोबर सेल्फी काढला आहे. हा सेल्फी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरत आहे. पंतप्रधान मेलोनी यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत पार पडलेल्या जी-२० शिखर परिषदेला हजेरी लावली होती. यावेळीही मोदी आणि मेलोनी यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत होते.

सीओपी-२८ शिखर परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर पंतप्रधान मोदी मायदेशी परतले आहेत. त्यांनी या शिखर परिषदेतील जागतिक हवामान कृती शिखर परिषदेचं उद्घाटन सत्र, विविध देशांच्या प्रमुखांची उच्चस्तरीय बैठक आणि सीओपी-२८च्या ‘ट्रान्सफॉर्मिंग क्लायमेट फायनान्स’ या विषयांवरील कार्यक्रमाला संबोधित केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Italian pm giorgia meloni shared selfie with pm modi hashtag melodi cop 28 summit in dubai uae rmm

First published on: 02-12-2023 at 11:08 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×