Italy Gurdwara shooting claims lives of two Indian nationals in Covo : इटलीतील बर्गामो प्रांतातील कोवो (Covo) शहरात शुक्रवारी दोन भारतीय पुरुषांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, असे स्थानिक प्रसारमाध्यमांनी रविवारी सांगितले. ही घटना वैशाखी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान शीख प्रार्थनास्थळ असलेल्या गुरुद्वारातून हे दोघे बाहेर पडत असताना घडली.

मृतांची ओळख पटली

‘ला सिसिलिया’ वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, कोवो येथील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या ‘गुरुद्वारा माता साहिब कौर जी’ जवळ मध्यरात्री हा हल्ला झाला. मृतांची ओळख ४८ वर्षीय रागिंदर सिंग आणि ४८ वर्षीय गुरमित सिंग अशी पटली आहे.

नियोजनबद्ध कट

हल्लेखोर गोळीबार केल्यानंतर कारमधून पळून गेला. प्राथमिक तपासानुसार, हा प्रकार अचानक उद्भवलेल्या भांडणातून घडलेला नसून, ‘थंड डोक्याने केलेला नियोजनबद्ध कट’ (Execution) असावा, असा संशय अधिकारी व्यक्त करत आहेत. गुन्ह्याच्या ठिकाणी गोळ्यांच्या सुमारे १० रिकमी बार सापडले आहेत.

गोळीबार करणारा व्यक्तीही भारतीयच?

एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारा व्यक्ती देखील भारतीयच असून तो नियमितपणे गुरुद्वारामध्ये येत असे. या गोळीबारात तिसऱ्या एका व्यक्तीलाही गोळी चाटून गेल्याचे या साक्षीदाराने सांगितले. विशेष म्हणजे, शनिवारी स्थानिक संस्थांच्या सहभागाने याच परिसरात वैशाखीचा अधिकृत सोहळा नियोजित होता.