जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी जागतिक मंदीची शक्यता व्यक्त केली आहे. युक्रेन- रशियाचे युद्धाचा अन्न आणि उर्जेच्या किमतींवर तसेच खत पुरवठ्यावर परिणाम होत आहेत. जगातील चौथ्या क्रमांकावर असणारी जर्मनीची अर्थव्यवस्था, ऊर्जेच्या वाढत्या किमतींमुळे आधीच मंदावली असल्याचे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम

रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या परिणामांमुळे, जागतिक बँकेने २०२२ साठीचा जागतिक वाढीचा अंदाज एप्रिलमध्ये ४.१ टक्क्यांवरून ३.२ टक्क्यांवर आला आहे. “आम्ही जागतिक जीडीपीकडे पाहत असताना मंदी कशी टाळता येईल हे पाहणे आत्ता कठीण आहे.” मालपासने कोणताही विशिष्ट अंदाज न देता सांगितले.

चीनच्या वाढीचा वेग मंदावला

मालपास म्हणाले, “उर्जेच्या किंमती दुप्पट करण्याची कल्पना स्वतःच मंदीला चालना देण्यासाठी पुरेशी आहे.” कोविड-१९ चा उद्रेक, चलनवाढ आणि देशाच्या पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या रिअल इस्टेटच्या समस्येमुळे चीनच्या वाढीचा वेग कमी झाला आहे. दुसरीकडे, मालपासने जागतिक मंदी कधी सुरू होईल याचे कोणतेही संकेत दिले नाहीत.

उर्जा स्त्रोतांच्या कमतरतेमुळे आणखी मोठा फटका

जागतिक बँकेच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, युक्रेन आणि रशियाची अर्थव्यवस्था आकुंचन पावण्याची शक्यता आहे, तर युरोप, चीन आणि युनायटेड स्टेट्सची अर्थव्यवस्था हळूहळू वाढण्याची अपेक्षा आहे. विकसनशील देशांना खत, अन्नधान्याचे भांडार आणि उर्जा स्त्रोतांच्या कमतरतेमुळे आणखी मोठा फटका बसत असल्याचा दावा त्यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Its hard right now to see how we avoid a recession world bank president dpj
First published on: 26-05-2022 at 19:11 IST