गेल्या वर्षापासून आपल्या सर्वांनाच करोनाच्या महामारीचा फटका बसला आहे. करोनाने आपल्या प्रियजनांना हिरावून नेलं, अनेकांना अनाथ केलं, अनेकांच्या मनावर गंभीर घाव घातले. या करोनानं प्राणीमात्रांनाही सोडलं नाही. अनेक पाळीव प्राणीही करोनाच्या या काळात बेघर आणि अनाथ झाल्याचं समोर येत आहे.

या महामारीच्या काळात अनेकांनी आपल्या पाळीव प्राण्यांना, पक्ष्यांना रस्त्यावर सोडलं आहे तर अनेकांनी त्यांना प्राण्यांसाठी असलेल्या शेल्टर होम्समध्ये, अनाथालयांमध्ये सोडलं असल्याचं प्राणी हक्क कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

दिल्लीचे प्राणी हक्क कार्यकर्ते अभिनव शिरहान सांगतात, “अनेक जणांनी आपापले पाळीव प्राणी विशेषतः कुत्रे आणि पक्षीसुद्धा शेल्टर होम्सच्या बाहेर सोडल्याचं आम्हाला दिसून आलं आहे. या लॉकडाउनमुळे रस्त्यावर येता जाता त्यांची काळजी घेणारे लोकही त्यांच्यापासून दुरावले. त्यामुळे या प्राण्या-पक्ष्यांचे फार हाल झाले आहेत.”

आणखी वाचा- नको आरटीपीसीआर, नको अँटिजेन….कुत्रेही शोधू शकतात करोनाचे रुग्ण

ते पुढे म्हणतात, “प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्था संघटनांच्या कार्यकर्त्यांनाही पोलीस अडवत असल्याने त्या माध्यमातूनही प्राण्यांपर्यंत मदत पोहचवणं अवघड होत आहे. एका कुत्र्याला वाचवण्यासाठी जात असताना मलाही दिल्ली पोलिसांनी अडवलं आणि सगळी कागदपत्रं असतानाही मला २००० रुपयांचा दंड भरावा लागला.
या विषयातल्या तज्ज्ञांनी सांगितलं, आर्थिक नुकसानीत असल्याने अनेकजणांनी आपल्याकडच्या प्राण्या-पक्ष्यांना सोडून द्यावं लागलं आहे. त्याचप्रमाणे सोसायटीत येणाऱ्या घरकाम करणाऱ्या लोकांनाही या काळात बंदी असल्याने त्यांच्याकडेही प्राण्यांना देता येत नव्हतं.”

आणखी वाचा- करोनाकाळात पाळीव प्राणीही रस्त्यावर

अशाप्रकारे प्राण्यांना अनाथ होताना पाहून फार दुःख होत असल्याचं ग्रेटर नोएडा भागातल्या प्राणीहक्क कार्यकर्त्या कावेरी राणा भारद्वाज म्हणाल्या, “अशा प्रकारे करोनाकाळात अनेक प्राण्यांना अनाथ आणि बेघर होताना पाहणं फारच दुःखदायक आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करते की त्यांनी या प्राण्यांचाही विचार करावा.”