JNU Violence : डाव्या संघटनांनी पूर्वनियोजित हिंसा घडवली : जावडेकर

पोलिसांच्या पत्रकारपरिषदेमुळे पाच दिवसांपासून सांगितलं जाणारं खोटं समोर आलं असल्याचेही म्हटले आहे.

संग्रहीत

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसचार मागे डाव्या संघटनाचं पूर्वनियोजन असल्याचा आरोप केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

आज पोलिसांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेद्वारे हे स्पष्ट झाले आहे की, मागील पाच दिवसांपासून जे अभाविप व भाजपाविरोधात आरोप लावले जात होते, ते खोटे आहेत. ही जाणीवपूर्वक केलेलं पूर्वनियोजन होत. या डाव्या संघटनांनीच हिंसाचाराचा कट रचला होता, सीसीटीव्ही आणि सर्व्हर नष्ट केले होते. असं जावेडकर यांनी म्हटलं आहे.

जेएनयू मध्ये झालेल्या हल्ल्यातील अज्ञात हल्लेखोरांची ओळख आम्हाला पटली आहे, असं दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. दिल्ली पोलिसांनी काही फोटोही पत्रकार परिषदेत सादर केले आहेत. तसेच आम्ही आत्तापर्यंत काही संशयितांना ताब्यात घेतलेलं नाही, मात्र हल्लेखोर डाव्या संघटनांशी संबंधित होते असं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेल्या आइशी घोषसह दहा जणांवर या प्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे.

तर, दुसरीकडे जेएनयू हिंसाचार प्रकरणात दिल्ली पोलिसांची भूमिका पूर्वग्रहदूषित आहे असा आरोप जेएनयूएसयूची अध्यक्ष आइशी घोषने केला आहे. “आपल्या देशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्यावरही हिंसाचाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र, माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. माझ्याकडेही माझ्यावर हल्ला कसा झाला याचे पुरावे आहेत” असंही आइशीने म्हटलं आहे. तसेच, “आम्ही काहीही चुकीचं वागलो नाही. आम्ही दिल्ली पोलिसांना घाबरत नाही. आम्ही लोकशाही मार्गाने सगळ्या प्रश्नांचा सामना करु. दिल्ली पोलीस पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन ठेवून वागत आहेत असाही आरोप आइशीने केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Its the left organisations that pre planned violence javadekar msr

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या