केंद्रीय राखीव पोलीस दलाने म्हणजेच सीआरपीएफने जम्मू-काश्मीरध्ये दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईसंदर्भातील आकडेवारी समोर आली आहे. १ मार्च २०२१ ते १६ मार्च २०२२ या वर्षभराच्या कालावधीमध्ये सीआरपीएफने जम्मू-काश्मीरमध्ये १७५ दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं आहे तर १८३ जणांना ताब्यात घेतलंय अशी माहिती सीआरपीएफचे निर्देशक कुलदीप सिंह यांनी मंगळवारी दिली. सीआरपीएफने १९ माओवाद्यांना ठार केलंय. तर डव्या कट्टरतावादी संघटनेतील ६९९ जणांना वेगवगेळ्या कारवायांदरम्यान या एका वर्षाच्या काळात अटक केल्याचंही कुलदीप सिंह यांनी म्हटलंय.

शनिवारी म्हणजेच १९ मार्च रोजी जम्मूमधील एमए स्टेडियममध्ये सीआरपीएफच्या ८३ व्या स्थापना दिनानिमित्त विशेष परेडचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. दिल्ली एनसीआरबाहेर पहिल्यांदाच सीआरपीएफच्या स्थापनादिनाचा जल्लोष साजरा केला जाणार आहे. बुधवारी कुलदीप सिंह यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची पहाणी करुन परिस्थिती उत्तम असल्याचं सांगत दिवसोंदिवस त्यामध्ये सुधारणा होत असल्याचं म्हटलंय.

Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
Voting facility for Mumbai Thane Pune residents only in societies Pune news
मुंबई, ठाणे, पुणेकरांना सोसायट्यांमध्येच मतदानाची सोय
pm Modi Yavatmal
पंतप्रधानांची यवतमाळमध्ये सभा, पोलिसांनी कशासाठी बजावली नोटीस?
Mumbaikars should have a referendum on Mahalakshmi Race Course proposal ex-BJP corporators demand
महालक्ष्मी रेसकोर्सच्या प्रस्तावावर मुंबईकरांचे सार्वमत घ्यावे, भाजपच्या माजी नगरसेवकांची मागणी

“केंद्र सरकारने वेगवेगळ्या केंद्रीय संरक्षण दलांना देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये वार्षिक कार्यक्रम घेण्याचे निर्देश दिले आहेत. या माध्यमातून संबंधित दलाची ताकद किती आहे हे सर्वसामान्यांपर्यंत पोहचावं असा हेतू आहे. यामुळे या दलांमधील जवानांना आणि सर्वसामान्यांना प्रेरणा मिळेल. खास करुन तरुणांना यामधून प्रेरणा मिळेल. देशामध्ये एकतेची भावना निर्माण करण्यासाठीही याचा फायदा होईल,” असं कुलदीप सिंह यांनी म्हलंय.

“वेगवेगळ्या स्तरांमधील ११७ विशेष व्यक्तींनी सीआरपीएफकडून सुरक्षा पुरवली जाते. व्हिआयपी सुरक्षेसाठीच्या खास दलांमध्ये ३२ महिला कार्यरत आहेत,” असं त्यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या कालावधीमध्ये सीआरपीएफने एकूण ४१ अती महत्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरवली होती. निवडणुकांनंतर यापैकी २७ जणांची सुरक्षा कमी करण्यात आलीय असंही सीआरपीएफच्या निर्देशकांनी सांगितलं.

काश्मीरमध्ये सुट्ट्यांदरम्यान घरी आलेल्या सीआरपीएफ जवानाची हत्या करण्यात आल्यासंदर्भात विचारलं असता कुलदीप सिंह या वर्षभरामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडल्याचं सांगितलं. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने कारवाई करत प्रकरणातील दोषींना अटक केली. जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना जवळवजळ संपुष्टात आल्याचंही ते म्हणाले. “परिस्थिती आमच्या हाताबाहेर होती असं नाहीय. पण अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर दगडफेकीच्या घटना जवळजवळ बंद झाल्यात. बाजूच्या देशांमधून होणारे दहशतवादी हल्ले आणि घुसखोरीचं प्रमाणही कमी झालंय,” असं कुलदीप सिंह म्हणाले.