माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या कार्यकाळाची अवघी ३ वर्ष त्यांनी पूर्ण केली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनखड यांनी राजीनामा दिला होता, ज्यामुळे अनेकांना आश्चर्चयाचा धक्का बसला होता. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात, त्यांनी आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे आणि डॉक्टरांचा सल्ला पाळण्यासाठी आपण राजीनामा देत असल्याचे कारण धनखड यांनी दिले होते. मात्र धनखड यांनी दिलेल्या कारणाने अनेकांचे समाधान धाले नव्हते.
राजस्थानच्या चुरू येथील एका छोटेखानी कार्यक्रमात गुरीवारी धनखड यांनी चांगल्या आरोग्याचे महत्त्व याबद्दल भाष्य केले. यावेळी आपण पदाचा राजीनामा हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिला नव्हता, तर आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी दिल्याचे म्हटले आहे.
धनखड म्हणाले की, “असे म्हणतात की, ‘पहिले सुख निरोगी काया’. मी माझ्या आरोग्याकडे कधीही दुर्लक्ष केलेले नाही. जेव्हा मी मी पदाचा राजीनामा देत आहे , तेव्हा मी कधीही असे म्हणालो नाही की मी आजारी आहे. मी फक्त एवढेच म्हणालो की मी माझ्या आरोग्याला प्राधान्य देत आहे आणि ते दिलेच पाहिजे.”
धनखड यांनी २१ जुलै २०२५ रोजी राष्ट्रपदी द्रोपदी मूर्मू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, ते आरोग्याची काळजी धघेण्यास प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्यांचे पालन करण्यासाठी राजीनामा देत आहेत.
अचानक राजीनामा दिल्याच्या मुद्द्यावरून धनखड यांनी बाळगलेल्या मौनाबाबत लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी देखील प्रश्न उपस्थित केले होते.
राहुल गांधी म्हणाले होते की, “त्यांनी राजीनामा का दिला, यामागे एक मोठी गोष्ट आहे. तुमच्यापैकी काहींना ती माहित असेल, काहींना नसेल. पण त्यामागे एक कहाणी आहे. आणि ते सध्या अज्ञातवासात का आहेत, यामागेही एक गोष्ट आहे. भारताचे उपराष्ट्रपती असूनही ते अशा परिस्थितीत का आहेत की ते एक शब्दही बोलू शकत नाहीत… आणि त्यांना लपून राहावे लागत आहे… अचानक, जो व्यक्ती राज्यसभेत आक्रमकपणे बोलायचा, तो आता… पूर्णपणे शांत झाला आहे.”
चुरूचे विद्यमान काँग्रेस खासदार राहुल कसवान आणि ऑलिंपियन तसेच माजी काँग्रेस आमदार कृष्णा पूनिया यांचे वडील माजी काँग्रेस खासदार राम सिंह कसवान यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जगदीप धनखड सहभागी झाले होते.
माजी उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, राम सिंह यांच्या प्रकृतीच्या चिंतेमुळे ते चुरू येथे आले आहेत आणि जेव्हा कधी ते अजारी असतात तेव्हा राम सिंह हे त्यांची चौकशी करणारे पहिले व्यक्ती असतात असेही धनखड यावेळी म्हणाले.

