scorecardresearch

पुलावामा सारख्या हल्ल्याचा कट उघड, डॉक्टरच्या फोन टॅपिंगमधून खुलासा

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या शांतता दिसत असली तरी, पाकिस्तानातील दहशतवादी संघटना मात्र स्वस्थ बसलेल्या नाहीत.

पुलवामा हल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या शांतता दिसत असली तरी, पाकिस्तानातील दहशतवादी संघटना मात्र स्वस्थ बसलेल्या नाहीत. काश्मीरमध्ये पुन्हा एकदा पुलवामासारखा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट रचला जात आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी टॅप केलेल्या एका फोनवरुन ही नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानध्ये कठुआ-सांबा रोडवर पुलवामासारखा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचं प्लानिंग सुरु आहे. जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अब्दुल मन्नान ऊर्फ डॉक्टरचा एक फोन सुरक्षा यंत्रणांनी टॅप केला. त्यातून हा खुलासा झाला आहे.
त्याने स्थानिक दहशतवा्दयांशी चर्चा करुन, कथुआ-सांबा रोडवरची भौगोलिक माहिती मागवली आहे.

सुरक्षा यंत्रणांच्या वाहनांना लक्ष्य करण्याचा कट आखला जात आहे. मागच्यावर्षी १४ फेब्रुवारीला पुलवामाच्या रस्त्यावर सीआरपीएफच्या बसला स्फोटकांनी भरलेले वाहन धडकवण्यात आले होते. यामध्ये ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. भारताने या हल्ल्याला बालाकोट एअर स्ट्राइकमधून उत्तर दिले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jaish planning pulwama type attack on kathua samba road in kashmir dmp