हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील कुख्यात जलेबी बाबा नावाच्या नराधमाला १२० महिलांवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली १४ वर्षांची शिक्षा झाली आहे. चहामध्ये गुंगीचे औषध टाकून तो महिलांना प्यायला द्यायचा आणि बेशूद्ध झाल्यानंतर बलात्कार करायचा. हद्द म्हणजे या प्रसंगाचे त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले. तेच व्हिडिओ दाखवून महिलांना ब्लॅकमेल करुन त्यांच्यावर पुन्हा अत्याचार करायचा. न्यायालयाने त्याला १४ वर्षांचा तुरुंगवास आणि ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. १० जानेवारी रोजी ही शिक्षा जेव्हा सुनावली गेली तेव्हा शेकडो महिलांनी आनंद व्यक्त केला.

आरोपी जलेबी बाबा याचे १२० हून अधिक अश्लील व्हिडिओ समोर आले आहेत. चहात गुंगीचे औषध मिसळवून महिलांना बेशूद्ध केल्यानंतर नराधम घृणास्पद काम करायचा. तसेच त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही काढून ठेवायचा. हे अत्याचार सहन न झाल्यामुळे काही महिलांनी पोलिसांकडे तक्रार केली, तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उजेडात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा बाबा उपचार करण्याच्या बहाण्याने महिलांना आश्रमात बोलवायचा आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करायचा.

The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
Why was business women Truong My Lan sentenced to death for corruption in Vietnam
भ्रष्टाचाराबद्दल उद्योजिकेला थेट फाशीची शिक्षा… व्हिएतनाममधील घटनेने जगभर खळबळ का उडाली? तेथे मृत्युदंडाचे प्रमाण इतके अधिक का?
Why Are performing satisfactorily mutual funds Rates So Low A Performance Analysis
समाधानकारक कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांची संख्या इतकी कमी कशी?
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक

फतेहाबादच्या महिला पोलिस अधिकारी बिमला देवी यांनी सांगितले की, “आरोपीकडून मिळालेल्या मोबाईलमध्ये १२० व्हिडिओ क्लिप आढळल्या आहेत. या क्लिपमध्ये ज्या महिलांचे शोषण झाले आहे, त्या महिलांनी पोलिसांकडे साक्ष नोंदवली आहे. तसेच या सर्व क्लिपची पडताळणी सायबर सेलकडून करण्यात आली आहे. या क्लिप मॉर्फ्ड केलेल्या नाहीत या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले आहेत.”

कोण आहे जलेबी बाबा

या जलेबी बाबाचे खरे नाव बिल्लूराम असे आहे. त्याला चार मुली आणि दोन मुलं आहेत. ८ वर्षांचा असताना बिल्लू घरातून बाहेर पडला. दिल्ली रेल्वे स्थानकावर फिरत असताना त्याची भेट बाबा दिगंबर रामेश्वर यांच्याशी झाली. त्यांना गुरु मानून तो उज्जैन येथील त्यांच्या आश्रमात गेला. १८ वर्षांचा झाल्यानंतर तो पुन्हा फतेहाबाद येथील आपल्या घरी परतला. घरच्यांनी त्याचे लग्न लावून दिले. १९८४ मध्ये त्याने जिलबी विकण्याचा व्यवसाय सुरु केला. अनेक वर्ष तो हा व्यवसाय करत होता. २० वर्षांपूर्वी त्याने फतेहाबाद येथील टोहाना येथे एक मंदिर बांधले. याठिकाणी तो तंत्र-मंत्र सांगून रुग्णांना बरं करतो असा दावा करायला तो करायला लागला. इथूनच त्याच्या अंधश्रद्धेच्या कामाची सुरुवात झाली.

जिलबी विकायचा म्हणून त्याचे नाव जलेबी बाबा पडले होते. २०१८ मध्ये या तथाकथित बाबाविरोधात पहिली तक्रार दाखल झाली होती. एका नंबरवर एमएमएस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला. यानंतर पोलिसांना जलेबी बाबाच्या दुष्क्रत्याचे १२० व्हिडिओज मिळाले.