अनंतनागमध्ये चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा

अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे

(संग्रहित छायाचित्र)

जम्मू- काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. बीजबहेरा येथे ही चकमक झाली असून परिसरात सध्या शोधमोहीम राबवली जात आहे.

अनंतनागमधील बीजबहेरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. शुक्रवारी पहाटे सैन्य, जम्मू- काश्मीर पोलिसांच्या पथकाने संयुक्त मोहीम राबवली. परिसराला सुरक्षा दलांनी वेढले आणि शोधमोहीम सुरु झाली. यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. परिसरात अजूनही शोधमोहीम राबवली जात आहे.

जम्मू- काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसात सुरक्षा दलाला मिळालेले हे दुसरे मोठे यश आहे. २० नोव्हेंबर रोजी शोपियाँ येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीतही चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर सुरक्षा दलातील एक जवानही या चकमकीत शहीद झाला होता. तर गुरुवारी कुलगाम येथील सैन्याच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक स्थानिक नागरिक जखमी झाला होता. सैन्याच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देताच दहशतवादी पसार झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jammu and kashmir encounter security forces terrorists killed anantnag sekipora

ताज्या बातम्या