दहशतवादावर अंकुश : जम्मू-काश्मीरमध्ये गृहविभागाकडून SIA गठीत करण्यास परवानगी!

ही यंत्रणा NIA आणि केंद्रीय यंत्रणांसोबत समन्वय साधून काम करणार.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

जम्मू-काश्मीरमध्ये गृह विभागाकडून NIA च्या धर्तीवर राज्य तपास यंत्रणा(SIA) गठीत करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही यंत्रणा एनआयए आणि केंद्रीय यंत्रणांसोबत समन्वय साधून काम करेल. राज्य तपास यंत्रणेची स्थापना दहशतवादावर अंकुश राखण्यासाठी करण्यात आली आहे. ही यंत्रणा दहशतवादाशी निगडीत सर्व घटनांचा प्रभावीपणे तपास करण्यासोबतच, कारवाई देखील करेल.
SIA मध्ये एक संचालक देखील नियुक्त केला जाईल.

राज्याच्या गृहविभागाकडून सोमवारी काढण्यात आलेल्या आदेशानुसार, एसआयएमध्ये एक संचालक असेल, तर यामध्ये अधिकारी व कर्मचारी हे सरकारकडून नियुक्त केले जातील. सीआयडी प्रमुख यंत्रणेचे मानद संचालक असतील. मूळ वेतनाच्या २५ टक्के विशेष प्रोत्साहन भत्ता एसआयएमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांना दिला जाईल. या आदेशात म्हटले आहे की, सर्व स्टेशन प्रभारी दहशतवादाशी संबंधित खटल्यांच्या नोंदीबाबत एसआयएला तत्काळ माहिती देतील.

SIA कोणत्याही प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन FIR नोंदवू शकते –

तपासादरम्यान दहशतवादाबाबत जरा देखील माहिती मिळाली तर त्याबाबत कळवावे लागेल. गुन्ह्याचे गांभीर्य, ​​तपासाची प्रगती आणि इतर बाबी लक्षात घेऊन डीजीपी कोणत्याही प्रकरणाचा तपास एसआयएकडे सोपवू शकतात. तपास SIA कडे सोपवला नाही तर, तपासाची प्रगती वेळोवेळी सांगितली जाईल याची खात्री पोलीस मुख्यालय करेल. SIA कोणत्याही प्रकरणाची स्वत:हून दखल घेऊन एफआयआर नोंदवू शकते, परंतु त्याची माहिती डीजीपीला द्यावा लागेल.

 या प्रकरणांचा तपास करेल यंत्रणा –

सर्व प्रकारच्या दहशतवादी कारवाया, दहशतवाद्यांना आर्थिक मदत, बनावट नोटांचे संचालन, दहशतवादी कट प्रकरणे, दहशतवादाशी संबंधित एनडीपीएस प्रकरणे, अपहरण आणि खून, दहशतवादाशी संबंधित चोरी, खंडणी, एटीएम आणि बँक लुटणे, शस्त्रे लुटणे, अपप्रचार आणि भारत सरकारच्या विरोधात खोटा प्रचार इत्यादी प्रकरणांची चौकशी ही यंत्रणा करेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jammu and kashmir home department has given its go ahead msr

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या