जम्मू काश्मीर प्रशासनाने सरकारच्या चांगल्या कामाविषयी कमी लिहितो म्हणत एका २९ वर्षीय पत्रकाराविरोधात सार्वजनिक सुरक्षा कायद्यानुसार (PSA) गुन्हा दाखल केलाय. सज्जाद गुल असं या पत्रकाराचं नाव आहे. इतकंच नाही पत्रकार शिकलेला असल्याने तो सोशल मीडियाचा वापर करून लोकांना सरकारविरोधात भडकाऊ शकतो, असा अजब युक्तीवाद काश्मीर प्रशासनाने केलाय.

काश्मीरमधील केंद्रीय विद्यापीठात पत्रकारितेचं शिक्षण घेणारा विद्यार्थी सज्जाद गुल एका स्थानिक वृत्तपत्रात काम करतो. ‘द कश्मीरवाला’ काम करणाऱ्या सज्जाद गुलला ६ जानेवारीला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात पोलिसांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केल्यानं गुन्हा दाखल केलाय. पत्रकार सज्जादने कारवाईत मारल्या गेलेल्या एका दहशतवाद्याच्या कुटुंबीयांचा भारतविरोधी घोषणा देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप आहे.

election
प्रचाराची सांगता; लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा, विदर्भातील पाच मतदारसंघांत उद्या मतदान
narendra modi
पंतप्रधानांकडून प्रचारात जुनेच मुद्दे; विरोधकांची टीका, मित्रपक्षांचीही भिस्त मोदींवरच
rahul gandhi
काँग्रेसच्या अमेठीतील उमेदवाराबाबत संदिग्धता
Lok Sabha Elections Union Minister Jitendra Singh from Udhampur Constituency in Jammu Congress challenge to him
जितेंद्र सिंह यांच्यापुढे एकत्रित विरोधकांचे आव्हान

पत्रकार सज्जाद गुलविरोधात ३ गुन्हे दाखल

सज्जाद गुलविरोधात ३ गुन्हे दाखल करण्यात आलेत. २ एफआयआर पोलिसांच्या तक्रारीवरून दाखल झालेत, तर एक गुन्हा स्थानिय तहसीलदारांनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल झाला आहे. बांदीपोरातील सुंबलमध्ये न्यायालयाने सज्जाद गुलला १५ जानेवारीला जामीन दिला. मात्र, दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने त्याच्यावर पीएसए अंतर्गत गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल करताना प्रशासनाने काय म्हटलं?

द इंडियन एक्सप्रेसला बांदीपोराचे उपायुक्त ओवैस अहमद यांची स्वाक्षरी असलेले काही कागदपत्रं मिळालीत. यात प्रशासनाने गुन्हा दाखल करताना म्हटलं, “तुम्ही कायमच सोशल मीडियावर वादग्रस्त विधानं आणि ट्विट केलीत. एक पत्रकार म्हणून तुम्ही केंद्र शासित राज्य सरकारच्या चांगल्या कामांवर खूप कमी रिपोर्टिंग करतात. तुम्ही शत्रुत्व आणि द्वेष पसरवत आहात. तुम्ही नेहमी राष्ट्र-विरोधी आणि असामाजिक ट्वीट करतात. केंद्र शासित प्रदेशाच्या धोरणांवर नकारात्मक टीका करतात. तुम्ही लोकांना सरकारविरोधात भडकावण्यासाठी तथ्यांची चाचपणी न करता ट्वीट करतात. तुम्ही दहशतवादी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या तारणहाराप्रमाणे वर्तन करतात. तसेच राष्ट्रीय हिताला बाधा पोहचेल असेच मुद्दे उपस्थित करतात.”

हेही वाचा : आधी काश्मीर प्रेस क्लबच्या नोंदणीला स्थगिती, आता कार्यालयच घेतलं ताब्यात, कारवाईवर एडिटर्स गिल्ड म्हणालं “सत्तापालट…”

“तुम्ही शिकलेले असल्याने सरकारविरोधात लोकांना भडकावण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केलाय. तुमच्या सोशल मीडियावरील वक्तव्यांनी शत्रुत्व आणि अराजकता पसरत आहे. कारण तुम्ही शिकलेले असल्याने काश्मीरच्या लोकांची दिशाभूल करणे तुमच्यासाठी सोपं आहे. तसेच तुम्ही लोकांना सरकारविरोधात सहजपणे भडकाऊ शकता,” असंही प्रशासनाने म्हटलंय.