दहशतवादी कारवायांना मदत केल्याच्या आरोपावरून जम्मू-काश्मीर प्रशासनाने फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे नातू अनीस-उल-इस्लाम यांना शनिवारी सरकारी सेवेतून काढून टाकले. प्रशासनाने राज्यघटनेच्या अनुच्छेद ३११ अंतर्गत विशेष तरतुदींचा वापर करून अनीसला सरकारी सेवेतून काढून टाकले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC) मध्ये संशोधन अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. हे सेंटर जम्मू-काश्मीर सरकारच्या सर्वात प्रतिष्ठित अधिवेशन आणि परिषद सुविधांपैकी एक असून ते उच्चस्तरीय बैठका आणि व्हीव्हीआयपी परिषदांसाठी वापरले जाते.

काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद गिलानी यांनी त्यांच्या नातवाच्या सरकारी नोकरीसाठी हिंसाचार केला होता, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. २०१६मध्ये काश्मीरमध्ये काही काळ अशांतता होती. मात्र, त्यांच्या नातवाच्या नियुक्तीनंतर लगेच परिस्थिती शांत झाली होती. गिलानी यांचं १ सप्टेंबर रोजी निधन झालं. अनीस हा सय्यद गिलानी यांच्या मुलीला मुलगा असून फुटीरतावादी नेते अल्ताफ अहमद शाह हे अनीसचे वडील आहेत. २०१६ मध्ये मेहबूबा मुफ्ती जम्मू -काश्मीरच्या मुख्यमंत्री असताना एसकेआयसीसी पर्यटन खात्याच्या अखत्यारीत होते.

Sanjay Singh alleges that Arvind Kejriwal is not allowed to meet his family face to face
केजरीवाल यांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न! कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचा संजय सिंह यांचा आरोप
Nitesh Rane, T Raja
प्रक्षोभक भाषण प्रकरण : नितेश राणे, गीता जैन, टी. राजांविरोधात फौजदारी कारवाई करणार का ? उच्च न्यायालयाचा पोलीस आयुक्तांना प्रश्न
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
Delhi aap
आप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, भाजपाही केजरीवालांच्या राजीनाम्यावर ठाम; दिल्लीत सत्ताधारी-विरोधकांची निदर्शने!

सरकारी सेवेत नियुक्ती होण्याच्या काही महिन्यांपूर्वी, अनीस ३१ जुलै ते ७ ऑगस्ट २०१६ दरम्यान पाकिस्तानला जाऊन आला होता. सय्यद गिलानींच्या सांगण्यावरून तिथे तो इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे कर्नल यासीरला भेटला होता, अशी माहिती सूत्रांनी न्यूज १८ला दिली. २०१६ मध्ये दहशतवादी बुरहान वानी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाल्यानंतर कट्टर फुटीरतावादी गिलानी यांनी राज्यात अशांतता घडवून आणली होती. यावेळी अनीसची नियुक्ती करण्यासाठी राज्य सरकारवर प्रचंड दबाव होता. तसेच संपूर्ण भरती प्रक्रियेत अनीसच्या फायद्यासाठी फेरफार करण्यात आला होता, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, सरकारी नोकरीत नियुक्ती होण्यापूर्वी अनीस श्रीनगर आणि त्याच्या आसपास कायदा आणि सुव्यवस्थेच्या घटना आणि इतर घटनांचे व्हिडिओ शूट करण्यासाठी ड्रोन उडवण्याची सोय करायचा आणि ते फुटेज आयएसआयकडे पाठवत होता. याशिवाय अनीस युएई आणि सौदी अरेबियामधील तीन संशयित दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याचंही सूत्रांनी सांगितलं.