दहशतवादी कारवायांना मदत केल्याच्या आरोपावरून जम्मू-काश्मीर प्रशासनाने फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे नातू अनीस-उल-इस्लाम यांना शनिवारी सरकारी सेवेतून काढून टाकले. प्रशासनाने राज्यघटनेच्या अनुच्छेद ३११ अंतर्गत विशेष तरतुदींचा वापर करून अनीसला सरकारी सेवेतून काढून टाकले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC) मध्ये संशोधन अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. हे सेंटर जम्मू-काश्मीर सरकारच्या सर्वात प्रतिष्ठित अधिवेशन आणि परिषद सुविधांपैकी एक असून ते उच्चस्तरीय बैठका आणि व्हीव्हीआयपी परिषदांसाठी वापरले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद गिलानी यांनी त्यांच्या नातवाच्या सरकारी नोकरीसाठी हिंसाचार केला होता, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. २०१६मध्ये काश्मीरमध्ये काही काळ अशांतता होती. मात्र, त्यांच्या नातवाच्या नियुक्तीनंतर लगेच परिस्थिती शांत झाली होती. गिलानी यांचं १ सप्टेंबर रोजी निधन झालं. अनीस हा सय्यद गिलानी यांच्या मुलीला मुलगा असून फुटीरतावादी नेते अल्ताफ अहमद शाह हे अनीसचे वडील आहेत. २०१६ मध्ये मेहबूबा मुफ्ती जम्मू -काश्मीरच्या मुख्यमंत्री असताना एसकेआयसीसी पर्यटन खात्याच्या अखत्यारीत होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu kashmir administration sacked anees ul islam grandson of separatist leader syed ali shah geelani from government job hrc
First published on: 17-10-2021 at 11:01 IST