मुस्लिमांबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्य केल्यानं भाजपा नेत्यावर गुन्हा दाखल

मुस्लिमांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा नेत्यावर एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपा नेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विक्रम रंधावा यांच्याविरोधात काश्मिरी मुस्लिमांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. वकील मुझफ्फर अली शाह यांनी लेखी तक्रार दिल्यानंतर बहू फोर्ट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम रंधावा यांनी मुस्लिमांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, टी-२० विश्वचषक सामन्यात पाकिस्तानच्या संघाने भारतावर विजय मिळवल्यानंतर काश्मीरच्या अनेक भागांमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला होता. या घटनांवर विक्रम रंधावांनी टिप्पणी केली होती. रंधावा यांच्या विरोधात जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपाकडून कारणे दाखवा नोटीस..

दरम्यान, जम्मू-काश्मीर भाजपाने देखील रंधावा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. “रंधावा यांचं वक्तव्य पक्षाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध आहे. भाजपा सर्व धर्मांचा आदर करण्यावर विश्वास ठेवते. रंधावा यांचा व्हिडिओ पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. रंधावा यांनी व्हिडीओत जी भाषा वापरली आहे, तशी भाषा सहन केली जाऊ शकत नाही,” असं भाजपाचे रविंदर रैना म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jammu kashmir bjp leader charged with making hate speech against muslims hrc

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या