Pahalgam Terror Attack Updates Today: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी दुपारच्या सुमारास झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे. देशाच्या अनेक भागातून आलेल्या पर्यटकांवर या भागात दहशतवाद्यांच्या एका गटानं अंदाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये आत्तापर्यंत २५ हून अधिक पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात डोंबिवलीच्या तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय, सुट्ट्यांसाठी काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांवर या हल्ल्यामुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Live Updates

Pahalgam Terror Attack Live Updates Today : जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा भारतासह जगभरातून निषेध

22:18 (IST) 23 Apr 2025

पहलगाम हल्ल्याच्या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस

अनंतनाग पोलिसांनी बुधवारी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला २० लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये बहुतेक पर्यटक होते.

21:46 (IST) 23 Apr 2025

भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू नदी पाणी करार स्थगित, पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकार आक्रमक

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने मोठे निर्णय घेतले असून, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू नदी पाणी करार स्थगित करण्यात आला आहे. अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे. यासोबतच पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत."

20:31 (IST) 23 Apr 2025

"केंद्र सरकार योग्य पावले उचलत आहे", राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्याची प्रतिक्रिया

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सुनील आंबेकर यांनी बुधवारी म्हटले आहे की, "पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. मला विश्वास आहे की केंद्र सरकार योग्य पावले उचलत आहे."

19:23 (IST) 23 Apr 2025

पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीला सुरुवात

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील अधिकृत निवासस्थानी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या (सीसीएस) उच्चस्तरीय बैठकीला सुरुवात झाली आहे.

18:36 (IST) 23 Apr 2025

"दहशतवाद्यांनी विशिष्ट धर्माला लक्ष्य केले, आरोपींना लवकरच उत्तर देणारा", संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया

सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलेल असे आश्वासन देशवासीयांना देत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हटले की, "काल, पहलगाममध्ये, एका विशिष्ट धर्माला लक्ष्य करून, दहशतवाद्यांनी एक भ्याड कृत्य केले, ज्यामध्ये अनेक निष्पाप लोकांनी प्राण गमावले. आरोपींना लवकरच जोरदार आणि स्पष्ट उत्तर मिळेल, असे आश्वासन मी देशाला देऊ इच्छितो."

17:45 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानी क्रिकेटपटूची दोन शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाला, "हृदयद्रावक..."

Mohammad Hafeez: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांबाबत शोक व्यक्त करणारा हाफिज हा आतापर्यंतचा एकमेव पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूने या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली नाही. ...सविस्तर वाचा
16:33 (IST) 23 Apr 2025

"आम्हाला न्याय हवाय", मृतांच्या नातेवाईकांचा अमित शाहांपुढे टाहो

आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहलगाम येथे पोहचले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी दहशतवादी हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचं सांत्वन केलं. यावेळी अमित शाहांना पाहून मृतांच्या नातेवाईकांनी त्यांच्यासमोर टाहो फोडला. "आम्हाला न्याय हवाय" असं म्हणत असताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर शाह म्हणाले, मृतांच्या कुटुंबीयांना झालेलं दुःख हे शब्दांत मांडता येणार नाही, मी शब्द देतो ज्यांनी निष्पाप जीव घेतले त्यांच्यापैकी एकालाही आम्ही सोडणार नाही.

16:25 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack Updates : पहेलगामहून निघण्यास एक दिवस उशीर झाला असता तर… जळगावच्या १४ पर्यटकांचे दैव बलवत्तर

Jammu and Kashmir Terror Attack Updates : जळगावच्या रेखा वाघुळदे, रेणुका भोगे, अनिता चौधरी या काही महिला गोळीबाराच्या दिवशी पहेलगाम येथेच होत्या. त्यांना लष्कराने वेळीच सुरक्षितस्थळी हलविल्याने कोणतीच इजा पोहोचली नाही. ...वाचा सविस्तर
15:55 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack Updates : "दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या", पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, "शेजारच्या देशातून..."

Jammu and Kashmir Terror Attack Updates : या भ्याड हल्ल्याला अनेकांनी अमानवी कृत्य संबोधलं आहे. हल्लेखोरांनी पर्यटकांना त्यांचं नाव विचारून त्यांच्यावर त्यांच्या नातेवाईकांसमोर गोळ्या झाडल्या. या कृत्यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. यावर आता एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ...सविस्तर बातमी
13:24 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली

Jammu and Kashmir Terror Attack Updates : या तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली असून आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी त्यांची नावे आहेत ...सविस्तर वाचा
13:22 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कटऱ्यात संप… वैष्णोदेवी दर्शनाला गेलेल्या मुंबईकर भाविकांचे हाल!

Jammu and Kashmir Terror Attack Updates : कटरा येथील बहुतेक हॉटेलमध्ये जागाच उपलब्ध नाहीत. त्यातच घोडेवाले आणि डोलीवाले संपात सहभागी झाले आहेत. ...वाचा सविस्तर
13:15 (IST) 23 Apr 2025

पहलगाम हल्याच्या सूत्रधाराचं नाव आणि त्याच्या साथीदारांचं स्केच जारी

गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दी रेजिस्टन्ट फ्रंटच्या म्होरक्याने पहलगाम हल्ल्याचा कट रचला होता. पाकव्याप्त काश्मीरमधील दोन साथीदारांच्या मदतीने त्याने हा कट पूर्ण केला. या दी रेजिस्टन्ट फ्रंटच्या म्होरक्याचं नाव सैफुल्लाह कसुरी उर्फ खालीद उर्फ सैफुल्लाह साजिद जट्ट असं आहे.

12:56 (IST) 23 Apr 2025

"मोदी सरकारने लष्करातील २ लाख पदं न भरल्यामुळे पहलगाममध्ये सुरक्षारक्षक नव्हते", राऊतांचा गंभीर आरोप

Kashmir Terrorist Attack : संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की नोटबंदीनंतर जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद पूर्णपणे संपेल. मात्र त्याच्या उलट घडतंय. ...वाचा सविस्तर
12:10 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्याचा काश्मिरातील इतर पर्यटकांनाही फटका…, श्रीनगर - जम्मू प्रवासासाठी २० तास!

Jammu and Kashmir Terror Attack Updates : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग १ ए बंद करण्यात आल्यामुळे जम्मूच्या दिशेने जाणारी सर्वच वाहने मुघल रोडमार्गे रवाना होत होती. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन पर्यटकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. ...वाचा सविस्तर
11:41 (IST) 23 Apr 2025

दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानने फेटाळली, संरक्षण मंत्री भारतावरच आरोप करत म्हणाले…

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण पाकिस्तानने दिलं आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतावरच पाकिस्तानात अशांतता पसरवल्याचा आरोप केला आहे.

11:17 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack Updates : "दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!", पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!

WorldWide Reaction on Jammu and Kashmir Terror Attack Updates : या भ्याड हल्ल्याचा भारतीयांनी तीव्र निषेध केलेला असताना जगभरातूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेक जागतिक नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला असून याप्रकरणी भारतासोबत असल्याची प्रतिक्रिया व्यक्तकेली आहे. ...अधिक वाचा
10:30 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानने फेटाळली, भारतावर आरोप करत संरक्षण मंत्री म्हणाले...

Jammu and Kashmir Terror Attack Updates : सत्ताधारी पीएमएल-एन पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे जवळचे सहकारी आसिफ यांनी हल्ल्याची जबाबदारी फेटाळून लावताना या हल्ल्यासाठी भारतालाच जबाबदार धरलं आहे. ...सविस्तर बातमी
10:13 (IST) 23 Apr 2025

"मोदी सरकारने लष्करातील २ लाख पदं न भरल्यामुळे पहलगामध्ये सुरक्षारक्षक नव्हते", राऊतांकडून गंभीर आरोप

संजय राऊत म्हणाले, अमित शाहांसाठी शेकडो सशस्त्र जवान श्रीनगरमध्ये होते, मात्र सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी एकही सुरक्षारक्षक नव्हता. हे सगळं का झालं? कारण मोदी सरकारने भारतीय सैन्यदलातील दोन लाख रिक्त पदे भरलेली नाहीत. संरक्षण विभागाच्या बजेटमध्ये त्यांनी कपात केली आहे. संरक्षण विभागासाठी वापरले जाणारे पैसे मोदी सरकारने लाडली बहन योजनेसारख्या लोकांना थेट पैसे देणाऱ्या योजनांवर वळवले आहेत. असं करून हे मोदी सरकार आपल्या सर्वांच्या सुरक्षेशी खेळतंय.

10:08 (IST) 23 Apr 2025

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी केंद्र सरकारची : संजय राऊत

संजय राऊत म्हणाले, पहलगामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात देशभरातील पर्यटकांना त्यांनी ठार मारलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जण होते. मोदी सरकारने काश्मीरवर स्वतःचं नियंत्रण ठेवण्यासाठी काश्मीरचं कलम ३७० हटवलं, जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवलं. त्यामुळे काल पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याची पूर्ण जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे.

09:57 (IST) 23 Apr 2025

"माझ्या पतीला डोक्यात गोळी लागली, काय घडतंय आम्हाला कळलंच नाही", पहलगाम हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांचं धक्कादायक अनुभवकथन!

Jammu and Kashmir Terror Attack Updates : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांमध्ये देशाच्या विविध भागातून आलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. ...सविस्तर बातमी
09:23 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack : "हॉटेल्स अन् फ्लाईट बुकिंग रद्द करा", नियोजित दौरे रद्द करण्यासाठी पर्यटकांकडून ट्रॅव्हल एजंट्सना फोन

Jammu and Kashmir Terror Attack Updates : "उद्या नियोजित १० टूरपैकी सात टूर आधीच रद्द करण्यात आले आहेत," असे हँगआउट हॉलिडेज काश्मीर चालवणारे ३६ वर्षीय फुरकान बशीर म्हणाले. ...सविस्तर बातमी
08:51 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमध्ये हल्ल्याच्या निषेधार्थ तीव्र पडसाद

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे जम्मू-काश्मीरमध्ये तीव्र पडसाद, अनेक भागांत जाळपोळ; शाळा, महाविद्यालये आणि रस्त्यावरची वाहतूक बंद

https://twitter.com/PTI_News/status/1914872629087068458

08:21 (IST) 23 Apr 2025

Pahalgam Terror Attack Updates: "दहशतवादी जवळपास २० मिनिटं बंदुका घेऊन फिरत होते, तुफान गोळीबार चालू होता", प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरकाप उडवणारा अनुभव!

Jammu and Kashmir Terror Attack Updates: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा नेमकं काय घडलं? ...अधिक वाचा
08:08 (IST) 23 Apr 2025

पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन टेकड्यांवरील घनदाट जंगलाने वेढलेल्या प्रशस्त मैदानात पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटत असताना, अचानक दहशतवाद्यांनी या टेकड्यांवरील मैदानात पोलिसी वेशात मंगळवारी दुपारी प्रवेश केला. ...अधिक वाचा
07:57 (IST) 23 Apr 2025

PM Modi meets NSA: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसमवेत बैठक

हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व परराष्ट्र मंत्र्यांची भेट, पहलगाम हल्ल्यासंदर्भात उच्चस्तरीय चर्चा; केंद्र सरकारकडून काय पावलं उचलली जाणार?

https://twitter.com/PTI_News/status/1914867195873780115

07:42 (IST) 23 Apr 2025

Raj Thackeray on Pahalgam Terror Attack: "केंद्रानं इस्रायलच्या पावलावर पाऊल टाकून...", राज ठाकरेंचं मोदी सरकारला आवाहन!

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली... ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील. केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा... १९७२ साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला... यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना, या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत... केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्याना कायमच संपवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली... एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोरच्याच्या धर्म विचारला... ही तुमची मुजोरी ? मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ... या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू देत त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे... केंद्र सरकारने काश्मीरमधून ३७० कलम हटवलं. त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे असं दिसत असताना, जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन, उद्योगधंदे कोण सुरु करेल ? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी.... हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाहीये... आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल - राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

https://twitter.com/RajThackeray/status/1914862955042054273

07:34 (IST) 23 Apr 2025

Rahul Gandhi on Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यावर राहुल गांधींची प्रतिक्रिया...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह व जम्मू काश्मीर काँग्रेसचे अध्यक्ष तारीक कर्रा यांच्याशी पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात बोललो. तिथल्या परिस्थितीबाबत माहिती घेतली. या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुंबीयांना न्याय आणि त्यासाठी आपल्या सर्वांचा पूर्ण पाठिंबा मिळणं आवश्यक आहे.

https://twitter.com/RahulGandhi/status/1914847673766809699

07:22 (IST) 23 Apr 2025

High Alert in UP: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट

उत्तर प्रदेश पोलीस हाय अलर्टवर, पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांचे उत्तर प्रदेश पोलिसांना आदेश, नेपाळला लागून असलेल्या सीमाभागातील जिल्ह्यांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात!

https://twitter.com/PTI_News/status/1914751950278811930

07:19 (IST) 23 Apr 2025

J&K Terror Attacke Live Updates: श्रीनगरमध्ये बंदसदृश्य स्थिती

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारची सकाळ श्रीनगरमध्ये प्रचंड तणावपूर्ण वातावरणात सुरू झाली. बाजारपेठा ओस पडल्याचं दिसून येत असून अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी श्रीनगर बंदची हाक दिली आहे.

https://twitter.com/PTI_News/status/1914855645251297679

07:16 (IST) 23 Apr 2025
J&K Terror Attacke Live Updates: आता फक्त निषेध करणं पुरेसं नाही - श्री श्री रवी शंकर

त्या दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी सगळ्या जगानं एकत्र यायला हवं. प्रत्येक व्यक्ती या हल्ल्याचा निषेध करेल. पण आता फक्त निषेध करणं पुरेसं नाही. काहीतरी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन या सगळ्या दहशतवादी मानसिकतेला खतपाणी घालणाऱ्यांना धडा शिकवायला हवा. जिथे कुठे अशा गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं तिथे कारवाई करायला हवी. निरपराध लोकांना दहशतवाद्यांच्या या अमानवी कृत्यातून लक्ष्य करण्यात आलं आहे. आम्ही हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत - श्री श्री रवी शंकर, आध्यात्मिक गुरू

https://twitter.com/PTI_News/status/1914855983731622323

Locals of Pahalgam hold candle march

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कँडल मार्च काढण्यात आला.

J&K Terror Attack in Pahalgam Live Updates Today: जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा भारतासह जगभरातून निषेध