scorecardresearch

“गृहमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी छोटीशी भेट”; जम्मू कारागृह महासंचालकांच्या हत्येनंतर दहशतवादी संघटनेचा इशारा

prison dgp hemant kumar lohia murder : जम्मू कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे.

“गृहमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी छोटीशी भेट”; जम्मू कारागृह महासंचालकांच्या हत्येनंतर दहशतवादी संघटनेचा इशारा
अमित शाह हेमंत लोहिया ( संग्रहित छायाचित्र )

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी एक मोठी घटना घडली आहे. जम्मू-काश्मीर कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची हत्या करण्यात आली आहे. धारदार शस्त्राने गळा चिरून त्यांची हत्या केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यात आता त्यांच्या हत्येची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी संलग्न असणाऱ्या पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट ( पीएएफएफ ) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

३ ऑगस्ट २०२२ मध्ये हेमंत लोहिया यांची जम्मू-काश्मीरच्या कारागृह महासंचालकपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच त्यांची हत्या झाली आहे. जम्मूतील उदयवाला भागातील एका घरात लोहिया यांचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनंतर घर काम करणारा फरार झाला आहे.

हेही वाचा – आठ वर्ष कार्यरत, ४५० कोटींचा खर्च; इंधन संपल्याने मंगळयानाशी संपर्क तुटला

“केव्हाही, कुठेही अचूपकपणे हल्ला करू शकतो”

दरम्यान, हेमंत लोहिया यांच्या हत्येची जबाबदारी पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. हत्येनंतर त्यांनी एक पत्रक जारी केलं आहे. त्यात म्हटलं की, ‘आमच्या विशेष पथकाने गुप्त अभियान राबवलं आहे. त्यामध्ये पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची हत्या केली आहे. हे एक मुख्य लक्ष होते. आम्ही केव्हाही, कुठेही अचूकपणे हल्ला करू शकतो. गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यापूर्वी ही एक छोटीशी भेट आहे,’ असा इशाराही पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटने दिला आहे.

हेही वाचा – उत्तर कोरियाने जपानवरुन क्षेपणास्त्र डागले; नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचा सल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज ( ४ सप्टेंबर ) जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यआधी एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्येनंतर संपूर्ण यंत्रणा हादरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या