Jammu Kashmir Terrorist Attack CCTV Video : जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात दहशतवाद्यांनी रविवारी (२० ऑक्टोबर) काही स्थलांतरित नागरिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच, दहशतवाद्यांनी एका डॉक्टरचीही हत्या केली. या दहशतवादी हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. हत्या करण्यात आलेले मजूर बोगद्याच्या प्रकल्पावर काम करत होते. काम करत असतानाच त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दरम्यान, या दहशतवादी हल्ल्याचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे. ज्यामध्ये दहशतवादी बंदुका दाखवत आहेत. दोन्ही दहशतवाद्यांचे चेहरे या सीसीटीव्ही व्हिडीओत स्पष्ट दिसत आहेत. या दहशतवाद्यांच्या हातात अमेरिकन बनावटीची एम-४ कार्बाइन रायफल व एके-४७ रायफल दिसत आहे.

मजुरांना ठार केल्यानंतर हे दहशतवादी ७ मिनिटे कामगारांच्या छावणीतच थांबले होते. हे देखील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच दहशतवाद्यांच्या सर्व हालचाली पाहून स्पष्ट होतंय की त्यांना त्या परिसराची (जिथे मजुरांच्या हत्या केल्या) चांगलीच माहिती होती.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Jammu Kashmir Terrorist Attack
गांदरबलमध्ये मजुरांवर हल्ला करणारा दहशतवादी (PC : TIEPL)

या दहशतवादी हल्ल्यात एकूण सात जण ठार झाले होते. यापैकी सहा जण काश्मीरबाहेरून कामासाठी गांदरबलमध्ये आले होते. तर एका स्थानिक डॉक्टरचाही दहशतवाद्यांनी बळी घेतला आहे. ते सर्व मजुर बांधकाम कंपनी एपीसीओ इन्फ्राटेकसाठी काम करत होते. ही कंपनी सध्या श्रीनगर-सोनमार्ग महामार्ग झेड-मोडवर बोगद्याचं काम करत आहे.

हे ही वाचा >> काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर फारुख अब्दुल्ला आक्रमक, पाकिस्तानला इशारा देत म्हणाले…

त्या रात्री काय घडलं?

जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात रविवारी रात्री काही स्थलांतरित कामगारांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. दहशतवाद्यांनी रात्री साडेसातच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याजवळ हल्ला केला. यावेळी काही मजूर काम करत होते, तर काहीजण काम थांबवून जेवण करण्यासाठी तिथून बाहेर पडत होते. या हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचून परिसरात सुरक्षा वाढवली. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचण्याआधीच दहशतवादी तिथून फरार झाले होते. बोगद्याचं काम जिथे सुरू आहे, तिथून जवळच मजुरांची राहण्याची व्यवस्था आहे. एक बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग आहे.

हे ही वाचा >> Turkey Terror Attack : तुर्कस्तानची राजधानी अंकारामध्ये दहशतवादी हल्ला; १० जणांचा मृत्यू, १४ जखमी

दहशतवाद्यांनी सर्वात आधी जिथे हल्ला केला तिथे सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता असं सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र, जिथे त्यांनी मजुरांच्या हत्या केल्या त्या ठिकाणी म्हणजेच मजुरांसाठीच्या कॅन्टीनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा होता. दोन दहशतवादी मोठ्या रायफलसह बोगद्याजवळ असलेल्या कॅन्टीनमध्ये गेले व त्यांनी मजुरांवर गोळीबार केला. कॅन्टीनबाहेर असलेल्या लोकांवरही अंधाधुंद गोळीबार केला.

Story img Loader