जपानमधल्या कंपनीला आग, २४ जणांचा मृत्यू

ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे

जपान येथील एका अॅनिमेशन प्रॉडक्शन कंपनीला आग लागल्याने २४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १२ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. असोसिएटेड प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. यामागे कारण काय होतं ते अद्याप समजू शकलेलं नाही असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

दरम्यान घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त होते आहे. आम्हाला या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर १२ मृतदेह सापडले. या सगळ्यांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला असल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या घटनेत ३५ जण जखमी झाले आहेत. काहींची प्रकृती गंभीर आहे असंही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. जेव्हा आग लागली तेव्हा इमारतीत ७० लोक होते अशी माहिती तिथल्या स्थानिकांनी दिली आहे.

काहींनी आगीचे बोळे फेकून ही आग लावली. असं करण्यामागे नेमकं काय कारण होतं? याचा शोध आम्ही घेत आहोत असं पोलिसांनी म्हटलं आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सुरु आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Japanese fire official says 24 people presumed dead more missing after kyoto animation studio fire scj