scorecardresearch

घटत्या लोकसंख्येमुळे जपान सरकार चिंताग्रस्त

जपानमध्ये यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या काळात एकूण ५,९९,६३६ बालकांचा जन्म झाला

घटत्या लोकसंख्येमुळे जपान सरकार चिंताग्रस्त
(संग्रहित छायाचित्र) (AP Photo/Eugene Hoshiko, File)

टोक्यो : जपानमध्ये यावर्षी जन्मलेल्या बालकांची संख्या गेल्या वर्षीपेक्षा विक्रमी नीचांकी असल्याने सरकारी प्रवक्त्याने याचे वर्णन ‘गंभीर परिस्थती’ असे केले आहे. घटत्या जन्मदरामुळे जपानमध्ये गेल्या काही वर्षांत लोकसंख्या वाढीचा वेग कमी झाला असून अधिक विवाह आणि मूल जन्माला घालण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सर्वसमावेशक उपाययोजना करण्याचा निर्णय जपानच्या सरकारने घेतला आहे.

जपानमध्ये यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या काळात एकूण ५,९९,६३६ बालकांचा जन्म झाला. गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या ४.९ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षी ८,११,००० बालकांचा जन्म झाला होता. जपानमध्ये लोकसंख्येचा दर घसरत असल्याने जपानी सरकारने चिंता व्यक्त केली असून लोकसंख्या वाढीसाठी सर्वसमावेशक उपाययोजना करण्याचे आश्वासन जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव हिरोकाझू मात्सुनो यांनी दिले.

जपान ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मात्र राहणीमानाचा खर्च जास्त आणि मंदावलेली वेतनवाढ अशी परिस्थती देशात आहे. बालके, महिला आणि अल्पसंख्याक यांच्यासाठी सर्वसमावेशक समाज बनवण्यात जपानमधील पुराणमतवादी सरकार मागे पडले आहे. या सर्वाचा परिणाम लोकसंख्येवर झाला आहे.  सरकारने गर्भधारणा, बाळंतपण आणि बाल संगोपनासाठी सबसिडीची देयके आणि इतर योजना करूनही त्याचा मर्यादित परिणाम झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 02:28 IST

संबंधित बातम्या