टोक्यो : जपानमध्ये यावर्षी जन्मलेल्या बालकांची संख्या गेल्या वर्षीपेक्षा विक्रमी नीचांकी असल्याने सरकारी प्रवक्त्याने याचे वर्णन ‘गंभीर परिस्थती’ असे केले आहे. घटत्या जन्मदरामुळे जपानमध्ये गेल्या काही वर्षांत लोकसंख्या वाढीचा वेग कमी झाला असून अधिक विवाह आणि मूल जन्माला घालण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सर्वसमावेशक उपाययोजना करण्याचा निर्णय जपानच्या सरकारने घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जपानमध्ये यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या काळात एकूण ५,९९,६३६ बालकांचा जन्म झाला. गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या ४.९ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षी ८,११,००० बालकांचा जन्म झाला होता. जपानमध्ये लोकसंख्येचा दर घसरत असल्याने जपानी सरकारने चिंता व्यक्त केली असून लोकसंख्या वाढीसाठी सर्वसमावेशक उपाययोजना करण्याचे आश्वासन जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव हिरोकाझू मात्सुनो यांनी दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Japanese government worried over declining in population zws
First published on: 29-11-2022 at 02:28 IST