मार्चअखेर्रपत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय जाट आरक्षण संघर्ष समितीने रविवारी दिला. आरक्षणासाठी आणखी वाट पाहण्याची जाट समाजाची तयारी नसून, आरक्षणाची मागणी मान्य न केल्यास आधीपेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल, असे समितीचे अध्यक्ष यशपाल मलिक यांनी सांगितले.
देशातील १३ राज्यांतील जाटांच्या प्रतिनिधींची बैठक ३ एप्रिलला दिल्लीत बोलावण्यात आली आहे. या बैठकीत आंदोलनाच्या स्वरूपाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे यशपाल मलिक यांनी सांगितले. सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात १० टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जाट समाजाने फेब्रुवारीत आंदोलन केले.