जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; चार जवान शहीद तर तीन जखमी

एका जवानाने आपल्या सहकारी जवानांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

sukma
(photo – ANI)

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात एका जवानाने आपल्या सहकारी जवानांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेत चार जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. शहीद आणि जखमी सर्व जवान केंद्रीय राखीव पोलीस दलाचे आहेत. गोळीबार करणाऱ्या जवानाचे नाव रितेश रंजन आहे.

रितेश रंजन नावाच्या जवानाने पहाटे पावणेचार वाजताच्या सुमारास लिंगालापल्ली येथे सहकारी सात सैनिकांवर गोळीबार केला. या या घटनेत सात जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने भद्राचलम परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, त्यातील चौघांचा मृत्यू झाला असून तिघांवर उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, जखमींपैकी दोन सीआरपीएफ जवानांना उपचारासाठी रायपूरला नेण्यात येत असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर सीआरपीएफने या प्रकरणाच्या चौकशीसाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jawan open fired on colleagues in chhattisgarh sukma four killed three injured hrc

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या