scorecardresearch

Premium

रेल्वेचे खासगीकरण नाही – जयंत सिन्हा

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार रेल्वे या सरकारी उपक्रमाचे खासगीकरण करणार नाही

केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा
केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार रेल्वे या सरकारी उपक्रमाचे खासगीकरण करणार नाही, मात्र त्याच्या विकासाकरिता खासगी गुंतवणूकदरांच्या गुंतवणुकीचे स्वागत केले जाईल, असे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले आहे.
रालोआ सरकारच्या कारकीर्दीत भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्यास आम्ही अनुकूल नाही, असे भिंड ते इटावा या प्रवासी गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी शनिवारी येथे आलेल्या सिन्हा यांनी पत्रकारांना सांगितले. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हेही या वेळी हजर होते.
रेल्वेमध्ये खासगी गुंतवणुकीसाठी आम्ही तयार आहोत. रेल्वेच्या विकासाकरिता अशा गुंतवणुकीचे सरकार स्वागत करेल, असे सिन्हा म्हणाले.
आर्थिक अडचणी असल्या तरी मध्य प्रदेशातील रेल्वेच्या जाळ्याचा विस्तार करण्यासाठी या वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात ४२०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचेही सिन्हा यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jayant sinha railway privatization is not possible

First published on: 29-02-2016 at 01:38 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×