जनता दल यूनायटेडचे नेते उपेंद्र कुशवाह यांच्या वाहन ताफ्यावर हल्ला झाला आहे. कुशवाह यांनी आरोप केला आहे की, भोजपूर जिल्ह्यातील जगदीशपूरमध्ये नायका टोल नाक्यावरील वळणावर त्यांच्या वाहन ताफ्यावर हल्ला दगडफेक करण्यात आली.
या हल्ल्यात सुदैवाने कुशवाह यांना कोणतीही दुखापत झाली नाही. याशिवाय कुशवाह यांना काही ग्रामस्थांनी काळे झेंडेही दाखवल्याची माहिती समोर आली आहे.
या हल्ल्याच्या घटेनबाबत माहिती देताना कुशवाह यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, काही समाजकंटकांनी दगडफेक केली. घटनास्थळी जेव्हा सुरक्षा रक्षक पोहचले तेव्हा हल्लेखोरांनी तिथून पळ काढला.
हल्ल्या झाल्याची माहिती नाही – तेजस्वी यादव
जदयू नेते उपेंद्र कुशवाह यांच्या वाहन ताफ्यावर हल्ला झाल्याच्या घटनेवर बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आमच्याकडे याबाबत काही माहिती आलेली नाही, जर असं काही घडलं असेल तर योग्य ती कारवाई केली जाईल. असं तेजस्वी यादव म्हणाले आहेत.