PM Narendra Modi Oath Ceremony Updates, 9 June 2024 : राज्य आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान निर्माण करणारे नितिन गडकरी पुन्हा एकदा मंत्रिमंडळात बसण्याची शक्यता आहे. एनडीएच्या नव्या कॅबिनेटमध्ये नितीन गडकरी यांना पुन्हा संधी मिळणार असल्याची शक्यता आहे. पण त्यांच्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्यावर जदयूचा डोळा आहे. त्यामुळे हे खातं कोणाच्या पारड्यात जातंय याबाबत साशंतका आहे. दरम्यान, त्यांचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रीपद अबाधित राहणार असल्याचीही चर्चा आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात जवळपास ३० खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. एनडीए सरकार स्थापन करण्यासाठी जदयू आणि तेलुगु देसम पार्टीने सहकार्य केल्याने त्यांनाही महत्त्वाची खाती जाण्याची शक्यता आहे. परंतु, देशपातळीवर अतिमहत्त्वाची असणारी खाती भाजपा स्वतःकडेच ठेवणार असल्याचे वृत्त आहे. गृह, अर्थ, संरक्षण, परराष्ट्र संबंध, रस्तेविकास, माहिती-तंत्रज्ञान, रेल्वे आणि शिक्षण ही महत्त्वाची खाती भाजपकडे राहणार आहेत. या खात्यांमध्ये भाजपाने गेल्या काही वर्षात अभूतपूर्व प्रगती साधली आहे. रस्तेविकास मंत्रालयामार्फत देशातील वाहतूक व्यवस्था सुधरवण्यात यश आलं आहे. यामागे नितीन गडकरी यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांचं मंत्रालय त्यांच्याकडे कायम राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> नरेंद्र मोदींच्या नव्या कॅबिनेटमध्ये शिंदे गटाचे किती खासदार असणार? ‘या’ नावांची सर्वाधिक चर्चा!

ही पदे कायम राहण्याची शक्यता

भाजपचे नेते राजनाथ सिंह, अमित शहा, निर्मला सीतारामन व एस. जयशंकर, नितीन गडकरी, पीयूष गोयल, अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, मनसुख मंडाविया, सर्बानंद सोनोवाल, किरेन रिजिजू, बिप्लब देब, गजेंद्र सिंह शेखावत, ज्योतिरादित्य शिंदे, प्रल्हाद जोशी आदींची केंद्रीय मंत्रिपदे कायम राहू शकतील.

हेही वाचा >> PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates : शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता

या खासदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, संजय जयस्वाल, राजीव प्रताप रुडी, जितीन प्रसाद, संजय बंडी, केरळमध्ये भाजपाचे खाते उघडणारे थिसूरचे सुरेश गोपी, जितेंद्र सिंह या नेत्यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते.

हेही वाचा >> NDA 3.0 : बहुमत गाठण्यासाठी मदत करणाऱ्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांना कोणती खाती मिळणार? ‘या’ मंत्रिपदांकडे लक्ष!

महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार?

महाराष्ट्रातून शिंदे गटाचे प्रतापराव जाधव, पवार गटाचे प्रफुल पटेल यांना मंत्री केले जाऊ शकते. भाजपमधून नारायण राणे  उदयनराजे भोसले व रिपब्लिकन पक्षातून रामदास आठवले यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो.

हेही वाचा >> मोदी मोदी नामगजरापासून नितीन गडकरी अलिप्त; सोशल मीडियावर कौतुक, व्हायरल व्हिडीओतील सत्य काय?

या घटकपक्षांनाही संधी मिळण्याची शक्यता

घटक पक्षांमध्ये एच. डी. कुमारस्वामी (जनता दल-ध), अनुप्रिया पटेल (अपना दल), जयंत चौधरी (आरएलडी), चिराग पासवान (एलजेपी), जितन मांझी (एचएपी), ललन सिंह व रामनाथ ठाकूर (जनता दल झ्रसं), राममोहन नायडू, हरीश बालयोगी व दग्गुमाला प्रसाद (तेलुगु देसम) आदींचा समावेश केला जाणार असल्याचे समजते.