दिल्लीनंतर आता झारखंडमध्येही मोठी राजकीय घडामोड होताना दिसत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन येत्या सोमवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठरावाचा सामना करणार आहेत. याबाबत विधानसभा सचिवालयाकडून झारखंडमधील आमदारांना पत्र पाठवण्यात आले आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री सोरेन विश्वासदर्शक ठराव मांडू इच्छित असल्याचे या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, यासंदर्भात रणनिती आखण्यासाठी भाजपाने देखील आज नेत्यांची बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

“काँग्रेस देशातून नष्ट…”, अमित शाह यांचं मोठं विधान, म्हणाले “भाजपाच तुमचं भविष्य”

“झारखंडमध्ये सध्या गोंधळाची स्थिती आहे. आमचे शिष्टमंडळ गुरुवारी राज्यपालांना भेटले होते. तेव्हा राज्यातील ही राजकीय अस्थिरता लवकरच दूर होईल, असे आश्वासन राज्यपालांनी दिले होते. मात्र, अद्याप तसे काहीही घडले नाही. त्यामुळे हा मुद्दा आता विधानसभेत मांडून बहुमत सिद्ध करू”, असे संसदीय कामकाज मंत्री आलमगीर आलम म्हणाले आहेत. दरम्यान, हेमंत सोरेन यांच्या आमदारकीबाबतचा निर्णय मुद्दाम लांबवून राज्यपाल घोडेबाजार करत असल्याचा आरोप यूपीएने केला आहे.

“…तर भाजपा ५० जागांपर्यंत घसरेल” २०२४ मधील निवडणुकीसाठी नितीश कुमारांनी विरोधकांना दिला राजकीय मंत्र

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी अपात्र ठरवण्याबाबत भाजपाने एक याचिका दाखल केली होती. याबाबत निवडणूक आयोगाने आपला निर्णय राज्यपाल रमेश बैस यांना २५ ऑगस्टला कळवला आहे. निवडणूक आयोगाने सोरेन यांची आमदारकी अपात्र ठरवण्याची शिफारस केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. तेव्हापासूनच हेमंत सोरेन सरकारवर राजकीय संकट घोंघावत आहे. झारखंडमध्ये सध्या झारखंड मूक्ती मोर्चा, काँग्रेस आणि आरजेडीचे युती सरकार आहे. सोरेन यांची आमदारकी रद्द झाल्यानंतरही या सरकारला धक्का पोहोचणार नाही, असे यूपीएकडून सांगण्यात येत आहे.