scorecardresearch

झारखंडमध्ये भाजपाचं ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी होणार?; सोरेन सरकार आज विश्वासदर्शक ठराव मांडणार

विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर भाजपा गटाकडूनही मोठ्या प्रमाणात हलचाली सुरू झाल्या आहेत. भाजपच्या सर्व आमदारांना विशेष अधिवेशनात सक्तीने सहभागी होण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

झारखंडमध्ये भाजपाचं ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी होणार?; सोरेन सरकार आज विश्वासदर्शक ठराव मांडणार
सोरेन सरकार आज विश्वासदर्शक ठराव मांडणार

झारखंडमध्ये सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. झारखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी आज (सोमवारी) विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोरेन सरकार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवरच काल सत्ताधारी यूपीएच्या सर्व आमदारांची झारखंडमध्ये बैठक घेण्यात आली, त्या बैठकीनंतरच आजच्या विश्वास ठरावविषयी चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे झारखंडमध्ये भाजपाचं ऑपरेशन लोटस यशस्वी होणार का याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

हेही वाचा- मोदी सरकारच्या काळात द्वेषाला खतपाणी ; राहुल गांधी यांची टीका; भाजपविरोधात एकजुटीचे विरोधकांना आवाहन

कोणत्या पक्षाकडे किती आमदार?

मुख्यमंत्री हेमंत सोरेन सरकारला ४९ आमदारांचा पाठिंबा आहे. ८१ सदस्य असलेल्या सभागृहात सर्वात मोठा पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाकडे सध्या ३० आमदार आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे १८ आणि आरजेडीकडे एक आहे तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडे २६ आमदार आहेत.

विश्वासदर्शक ठरावाबाबत आमदारांसोबत चर्चा

रविवारी संध्याकाळी छत्तीसगडमधील रायपुरमधून झारखंडला घेऊन आलेल्या सत्ताधारी यूपीएच्या सर्व आमदारांना रांचीमधील सर्किट हाऊसमध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्व आमदारांबरोबर काल रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आमदारांबरोबर आजच्या विश्वास ठरावाबाबत चर्चाही केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचा- “भाजपा, आरएसएसने देशाचे विभाजन केले”; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, “२०१४ पासून भारतात….”

भाजपाची रणनिती काय असेल?

भाजपकडूनही रविवारी सायंकाळी आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत आजच्या विशेष अधिवेशनासंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीत आमदारांना अनेक सूचना देण्यात आल्या आहेत. भाजपच्या सर्व आमदारांना विशेष अधिवेशनात सक्तीने सहभागी होण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या