झारखंडमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत असताना बालविवाहाबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या ताज्या आकडेवारी नुसार झारखंडमध्ये बालविवाहाची टक्केवारी सर्वाधिक ५.८ टक्के असल्याचे समोर आले आहे. तर १८ वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच मुलींचे विवाह होण्याचे प्रमाण १.९ टक्के आहे. देशात सर्वात कमी म्हणजे शून्य बालविवाह केरळमध्ये आहे.

हेही वाचा – महिला आमदाराने केलं कार्यकर्त्याशी लग्न; पंजाबमधील विवाह सोहळा चर्चेत

झारखंडमध्ये होणारे बालविवाहांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त बालविवाह हे ग्रामीण भागात तर उर्वरीत शहरी भागात होत असल्याचेही या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींचे मोठे विधान, म्हणाले “संघ आणि वीर सावरकर तर…”

झारखंड आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यात २१ वर्षांपूर्वी महिलांचे विवाह होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आकडेवारी नुसार ५४.०९ टक्के मुलींचे विवाह हे २१ वर्षांच्या आत होतात. झारखंडमध्ये हेच प्रमाण ५४.६ टक्के एवढे आहे. तर देशात २९.५ टक्के मुलींचे विवाह २१ वर्षांच्या आत होत आहेत.