लखनऊ : अलीकडेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले जितिन प्रसाद यांचा रविवारी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. मंत्रिमंडळ विस्तारात इतर ६ जणांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

उत्तर प्रदेश या महत्त्वाच्या राज्यातील पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या निवडणुकांची भाजप तयारी करत असतानाच हा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजभवनात झालेल्या एका समारंभात राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी नव्या मंत्र्यांना शपथ दिली. पलटू राम, छत्रपाल गंगवार, संगीता बलवंत बिंड, धर्मवीर प्रजापती, संजीव कुमार गौर व दिनेश खाटिक अशी नव्याने समावेश करण्यात आलेल्या राज्यमंत्र्यांची नावे आहेत. या विस्तारामुळे मंत्रिमंडळाच्या सदस्यसंख्येची ६० ही कमाल मर्यादा गाठली गेली आहे.

dgca fines air india rs 30 lakh after death of elderly passenger due to lack of wheelchair
इस्रायलमधील परिस्थिती चिघळली? तेल अवीवला जाणारी एअर इंडियाची सेवा पुन्हा स्थगित!
Amit shah on ucc
“देश शरियावर चालवायचा का?” UCC ला विरोध करणाऱ्यांना अमित शाहांचा थेट प्रश्न, म्हणाले, “अनेक मुस्लिम देश…”
supreme court rejected plea of dhangar community
धनगर आरक्षण याचिका फेटाळली; आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीस न्यायालयाचा नकार
israel iran tensions updates israel hits back at iran
पश्चिम आशियावर युद्धाचे ढग? इराणच्या इस्फान शहरावर इस्रायलचा ड्रोनहल्ला