उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात गुरूवारी सकाळी झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. लोलाब परिसरात चार दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराकडून शोध मोहिम हाती घेण्यात आली. शोध मोहिम सुरू असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार केला. भारतीय जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. मात्र, हे दहशतवादी कोणत्या संघटनेचे आहेत, याची ओळख अद्यापही पटलेली नाही. ही कारवाई अद्यापही सुरु असून अन्य दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.

हमासच्या क्रौर्याची परिसीमा; इस्रायली तरुणीच्या अर्धनग्न मृतदेहाची काढली धिंड; व्हिडीओमुळे दहशतवाद्यांचे अत्याचार आले जगासमोर!

समोरच्या बाकावरून : माहिती नको, आकडेवारी द्या..

“कॅनडाच्या पंतप्रधानांना ही सवयच आहे”, जस्टिन ट्रुडोंना श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सुनावलं; म्हणाले, “काही दहशतवाद्यांना…!”

देशकाल: द्यायचे आहे, पण द्यायचे नाही!