मोदी व शहांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे निवेदन ‘जेएनयू’च्या प्रशासनाने ‘एक्स’वर मंगळवारी प्रसिद्ध केले. या घटनेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने निलंबन, विद्यापीठातून कायमस्वरूपी बडतर्फी यासह शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यापीठे ही नवोपक्रम आणि नवीन कल्पनांची केंद्रे आहेत. त्यांना द्वेषाच्या प्रयोगशाळांमध्ये रूपांतरित करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे. परंतु कोणत्याही प्रकारची हिंसा, बेकायदेशीर वर्तन वा देशविरोधी कृत्य कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. – जेएनयू प्रशासन