scorecardresearch

Premium

कन्हैयाने पँट ओली करेपर्यंत आम्ही त्याला मारत होतो; ‘त्या’ वकिलांची स्टिंग ऑपरेशनदरम्यान कबुली

माझ्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला तरी मी त्याला सोडणार नाही

JNU row , Kanhaiya kumar, beating up Kanhaiya for 3 hrs till he wet his pants , Lawyers , sting operation, Loksatta, loksatta news, marathi, Marathi news
कन्हैयाला १५ फेब्रुवारी रोजी पोलीस बंदोबस्तात पतियाळा न्यायालयात नेले जात असताना विक्रम सिंग चौहान आणि यशपाल सिंग या दोन वकिलांनी तेथे जमलेल्या आंदोलक विद्यार्थी आणि पत्रकारांना मारहाण केली होती.

‘जेएनयू’तील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला पोलीस कोठडीत असताना आम्ही दोघांनी त्याला सुमारे तीन तास चोपले होते, असा खळबळजनक खुलासा ‘इंडिया टुडे’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशदरम्यान दोन वकिलांनी केला आहे. या मारहाणीमुळे कन्हैयाने स्वत:ची पँट ओली केल्याची कबुलीही विक्रम सिंग चौहान आणि यशपाल सिंग यांनी दिली आहे. आम्ही त्याला साधारण तीन तास मारत होतो. यावेळी आम्ही त्याच्या तोंडून ‘भारत माता की जय’ ही घोषणा वदवून घेण्याचाही प्रयत्न करत होतो. अखेर त्याने तसे म्हटल्यानंतर आम्ही त्याला जाऊ दिले, असे चौहान याने सांगितले.

कन्हैयाला १५ फेब्रुवारी रोजी पोलीस बंदोबस्तात पतियाळा न्यायालयात नेले जात असताना विक्रम सिंग चौहान आणि यशपाल सिंग या दोन वकिलांनी तेथे जमलेल्या आंदोलक विद्यार्थी आणि पत्रकारांना मारहाण केली होती. स्टिंग ऑपरेशनदरम्यान याबद्दलची कबुलीही देताना त्यावेळी आम्हाला पोलिसांचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे यशपाल सिंग याने सांगितले. आम्ही गणवेशात नसल्यामुळे कन्हैयाला मारू शकत नसल्याचेही पोलिसांनी आम्हाला सांगितले होते, असेही यशपालने म्हटले आहे.
माझ्यावर कोणताही खटला दाखल होवो, मी कुठूनही पेट्रोल बॉम्ब आणेल. माझ्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला तरी मी त्याला सोडणार नाही. मला कन्हैयाला ठेवलेल्या जेलमध्ये जाऊन तिथे त्याला मारायचे आहे. मी माझ्या जामीनासाठी अर्ज करणार नाही. मी एक किंवा दोन दिवसांसाठी तुरूंगात जाईन, असे यशपाल सिंग याने म्हटले आहे.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल

वकिलांच्या गटाचा पुन्हा हैदोस 
‘माझ्याकडे बंदूक असती तर त्याला मी गोळीही मारली असती’ 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-02-2016 at 15:38 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×