इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील सशस्त्र संघटना हमासमध्ये गेल्या २१ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत ९,००० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. या युद्धामुळे जगाची दोन गटांमध्ये विभागणी झाली आहे. या युद्धात अनेक राष्ट्र इस्रायलच्या बाजूने उभी आहेत. तर अनेक देशांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला आहे. त्याचबरोबर वेगवेगळे देश, वृत्तसंस्था आपापल्या परिने या युद्धाचं विश्लेषण करत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन सातत्याने या युद्धावर भूमिका मांडत आहेत. दरम्यान, बायडेन यांनी नुकतंच या युद्धाबाबत भारताचा उल्लेख करत मोठं वक्तव्य केलं आहे.

जो बायडेन म्हणाले, भारत-मिडल ईस्ट इकोनॉमिक कॉरिडोर हा इस्रायल-हमास युद्धामागचं कारण असू शकतो. अलिकडेच नवी दिल्ली येथे जी-२० शिखर परिषद भरली होती. या परषदेत, भारत-मिडल ईस्ट कॉरिडोरची घोषणा करण्यात आली. या कॉरीडोरची घोषणा ही या युद्धाचं कारण असू शकते. कॉरिडोरच्या घोषणेमुळेच हमासने इस्रायलवर हल्ला केला असावा, असं मला वाटतं.

PM Modi Austria visit look back at Indira Gandhi trip to Austria 41 years ago
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या ४१ वर्षे आधी इंदिरा गांधींनी दिली होती ऑस्ट्रियाला भेट; काय होते दौऱ्याचे महत्त्व?
narendra modi in austria
इंदिरा गांधींनंतर ४१ वर्षांत ऑस्ट्रियाला भेट देणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान; ही भेट देशासाठी किती महत्त्वाची?
Pm narendra modi in russia
रशियातील पंतप्रधान मोदींच्या भाषणात ‘अस्त्रखान हाऊस ऑफ इंडिया’चा उल्लेख; त्याचे गुजरात कनेक्शन काय?
Volodymyr Zelenskyy on Putin and modi meeting
पंतप्रधान नरेंद्र मोदी – पुतिन यांच्या भेटीवर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची नाराजी; म्हणाले…
modi and putin
पंतप्रधान मोदी रशियाच्या दौऱ्यावर,युक्रेन-रशिया युद्धानंतर पहिलीच भेट
The israeli supreme court s historic verdict on hardline jews military service is compulsory
विश्लेषण: इस्रायल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे नेतान्याहूंची कोंडी? कट्टर ज्यूंनाही लष्करी सेवा अनिवार्य करण्याचा निर्णय का गाजतोय?
Bangladesh PM Sheikh Hasina meets PM Modi on her second trip to India in 2 weeks
बांगलादेशच्या पंतप्रधान हसीना १५ दिवसांत दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर; पंतप्रधान मोदींबरोबर काय होणार चर्चा?
Putin thanks North Korea for support in Ukraine
अमेरिकेच्या निर्बंधांवर मात करण्यास सहकार्य; युक्रेनमधील पाठिंब्याबाबत पुतीन यांच्याकडून उत्तर कोरियाचे आभारप्रदर्शन

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार जो बायडेन यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्याबरोबरच्या बैठीकनंतर हे वक्तव्य केलं. बायडेन म्हणाले, माझा असा केवळ अंदाज आहे. हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत या कॉरिडोरची घोषणा केली होती. या प्रकल्पामुळे भारत आणि मध्य-पूर्वेतील अनेक देश रेल्वेमार्गाने जोडले जाणार आहेत.

हे ही वाचा >> “इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ५० ओलीस ठार”, हमासचा दावा; गुप्तचर अधिकारी म्हणाले…

भारत-मिडल ईस्ट कॉरिडोर काय आहे?

जी-२० सदस्य राष्ट्रांच्या शिखर परिषदेत भारत, पश्चिम आशिया आणि युरोपला जोडणारी एक दळणवळण मार्गिका (कनेक्टिव्हिटी कॉरिडोर) लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पात भारतासह संयुक्त अरब अमिराती, सौदी अरब, युरोपियन संघ, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि अमेरिका असे मोठे देश सहभागी झाले आहेत. व्यापारासाठी, दळणवळणासाठी आणि पायाभूत सुविधांमधील सहकार्याच्या दृष्टीने हा प्रकल्प राबवला जाणार आहे.