scorecardresearch

जॉन ली यांची हाँगकाँगच्या नेतेपदी निवड

या निवडणुकीतील एकमेव उमेदवार असलेल्या ली यांनी झालेल्या मतदानापैकी ९९ टक्क्यांहून अधिक मते मिळवून ही निवडणूक जिंकली.

एपी, हाँगकाँग : हाँगकाँगमधील लोकशाहीवादी चळवळ दडपून टाकण्यासाठी प्रयत्न करणारे कट्टरवादी सुरक्षा प्रमुख जॉन ली यांची रविवारी प्रामुख्याने चीनधार्जिण्या समितीने केलेल्या मतदानात शहराचा यापुढील नेता म्हणून निवड करण्यात आली.

या निवडणुकीतील एकमेव उमेदवार असलेल्या ली यांनी झालेल्या मतदानापैकी ९९ टक्क्यांहून अधिक मते मिळवून ही निवडणूक जिंकली. मतदार असलेल्या सर्व, म्हणजे १५०० समिती सदस्यांची बीजिंगमधील मध्यवर्ती सरकारने काळजीपूर्वक छाननी केली होती.

 ली हे १ जुलै रोजी सध्याच्या नेत्या कॅरी लाम यांची जागा घेतील. लाम यांची पाच वर्षांची कारकीर्द त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी प्रचंड लोकशाहीवादी निदर्शने, जवळजवळ संपूर्ण मतभेद मोडून काढणारी दडपशाही, आरोग्य यंत्रणा कोलमडून टाकणारी अलीकडची करोना लाट यांनी गाजली. यामुळे, पाश्चिमात्य धर्तीचे स्वातंत्र्य असलेला आंतरराष्ट्रीय बिझिनेस हब म्हणून असलेली हाँगकाँगची प्रतिष्ठा डागाळली होती.

लाम यांनी एका निवेदनाद्वारे ली यांचे अभिनंदन केले आणि आपण निवडणुकीचा निकाल चीनला सादर करू असे सांगितले. केवळ चीनशी एकनिष्ठ असलेले ‘देशभक्त’ निवडून येऊ शकतील याची खात्री करण्यासाठी या निवडणुकीपूर्वी हाँगकाँगच्या मतदान कायद्यांमध्ये गेल्या वर्षी मोठे बदल करण्यात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: John lee elected as hong kong s new leader zws