व्हॉट्स’आप’मय

लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेली भाजपची मोदी’लाट’ केजरीवालांच्या ‘आम आदमी’ने दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘झाडू’न साफ केली.

लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेली भाजपची मोदी’लाट’ केजरीवालांच्या ‘आम आदमी’ने दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘झाडू’न साफ केल्याचे चित्र आहे. ७० जागांच्या दिल्ली विधानसभेत भाजपला दुहेरी आकडा देखील गाठता येण्याची चिन्हे नाहीत. ‘आप’च्या या अभुतपूर्व विजयाच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडीयावर देखील भाजपच्या दारूण पराभवावर विनोदांचा महापूर आला आहे. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर भाजप आणि काँग्रेसच्या पराभवाची भरभरून खिल्ली उडवली जात आहे. यात अगदी मोदींच्या स्वच्छता अभियानाची देखील ‘व्हॉट्अॅप’वीरांनी दिल्ली पराभवावरून टर उडवली आहे. “मोदींनी सगळ्यात जास्त झाडूचा प्रचार केला..पडला ना महागात स्वच्छ भारत अभियान”, मोदींचे स्वच्छ भारत अभियान ‘आप’ने चांगलेच मनावर घेतलेले दिसते संपूर्ण दिल्ली ‘झाडू’न टाकली, असे एक ना अनेक विनोद व्हॉट्सअॅपवर शेअर केले जात आहेत. एकंदर दिल्लीतील ‘आप’च्या ऐतिहासिक विजयावर ‘व्हॉट्सअॅप’ आज ‘आप’मय झालेले पहायला मिळत आहे.

व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरील काही विनोद-
– “मोदींनी दिली १५० मफलरची ऑर्डर..दिल्लीच्या निकालानंतर धोरणात्मक निर्णय”
– “मोदींनी सगळ्यात जास्त झाडूचा प्रचार केला… पडला ना महागात स्वच्छ भारत अभियान”
–  “ओबामांची जादू ओसरली.. ३ दिवस प्रचार करुनही भाजपचा दारुण पराभव”
– “ब्रेकिंग- दिल्लीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारुन ओबामा राजीनामा देणार”
– किरण बेदी म्हणतात..! करवटें बदलते रहे सारी रात हम, ‘आप’की कसम, ‘आप’की कसम
– शरद पवार मनातल्या मनात म्हणतात…! चार जागांचं दु:ख काय असतं ते कळेल आता मोदी आणि शहांना
– दिल्लीच्या जनतेने योग्य क्रम लावला ए फॉर आप, बी फॉर बीजेपी आणि सी फॉर काँग्रेस

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jokes on bjp defeat in delhi election