scorecardresearch

२०१९ पेक्षाही मोठा विजय मिळवू! अमित शहा यांचा विश्वास; जे. पी. नड्डा यांना भाजप अध्यक्षपदी मुदतवाढ

भारतीय जनता पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांना पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत (जूनपर्यंत) पदावर कायम ठेवण्याचा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.

२०१९ पेक्षाही मोठा विजय मिळवू! अमित शहा यांचा विश्वास; जे. पी. नड्डा यांना भाजप अध्यक्षपदी मुदतवाढ
पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा

पीटीआय नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांना पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत (जूनपर्यंत) पदावर कायम ठेवण्याचा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. नड्डा यांच्या मुदतवाढीची घोषणा करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप २०१९पेक्षाही अधिक बहुमत मिळवेल,’ असा विश्वास व्यक्त केला.चालू वर्षांत नऊ राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुका आणि त्यापाठोपाठ पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जे. पी. नड्डा यांना मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आधीपासूनच चर्चेत होती.त्यावर नवी दिल्लीत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नड्डा यांना मुदतवाढ देण्याबाबतचा ठराव मांडताच तो एकमताने मंजूर करण्यात आला.

नड्डा यांच्या आधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अमित शहा यांना २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी अध्यक्षपदी मुदतवाढ देण्यात आली होती. त्याच धर्तीवर नड्डा यांनाही मुदतवाढ देण्यास भाजपच्या संसदीय मंडळाने मंजुरी दिली होती. नड्डा यांचे नेतृत्व आणि पक्षासाठीचे योगदान यांची प्रशंसा करताना अमित शहा म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सार्वत्रिक निवडणुकीपेक्षाही मोठा विजय आम्ही मिळवू.’ नड्डा यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भाजपने विधानसभांच्या १२० पैकी ७३ जागी पोटनिवडणुकीत विजय मिळवल्याचे शहा म्हणाले. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, आसाम या राज्यांच्या विधानसभा निवडणुका जिंकल्याचा उल्लेखही शहा यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 03:11 IST

संबंधित बातम्या