scorecardresearch

“…तर तुमच्या मफलरचीही ‘जेपीसी’ चौकशी करावी लागेल”, भाजपाचं मल्लिकार्जुन खरगेंना प्रत्युत्तर

“शेअर बाजारात सुरु असलेल्या उलथा-पालथीची तपास यंत्रणा…”

Mallikarjun kharge
मल्लिकार्जुन खरगे ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

अदाणी समूह प्रकरणावरून विरोधी पक्षाने संसदेत केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी ( ७ फेब्रुवारी ) संयुक्त संसदीय समितीच्यी चौकशीची ( जेपीसी ) मागणी केली. ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं. तरीही, देशातील मोजकेच उद्योगपती श्रीमंत होतं आहेत. मोदींच्या एका जवळील मित्राची संपत्ती अडीच वर्षात १४ टक्क्यांनी वाढली, असा हल्लाबोल खरगेंनी केला. याला आता भाजपाने प्रत्युत्तर देत खरगेंच्या ‘मफलर’वरून टीका केली आहे.

राज्यसभेचे खासदार पीयूष गोयल यांनी म्हटलं की, “काँग्रेसचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. शेअर बाजारात सुरु असलेल्या उलथा-पालथीची तपास यंत्रणा चौकशी करत आहे. जे आरोप सिद्ध झालेत, त्याची जेपीसी अंतर्गत चौकशी करण्यात येते; अथवा असे प्रकरणे जे सरकार संबंधित घोटाळ्यांशी निगडीत आहेत.”

हेही वाचा : “माझ्या भाषणातले शब्द का काढले गेले?” राहुल गांधी संतापून माध्यमांना म्हणाले, “पंतप्रधान मोदी अदाणीला…”

“खरगेंनी लुई व्हिटन (Louis Vuitton) चं ‘मफलर’ घातलं आहे. ते ‘मफलर’ कुठून घेतलं? कोणी दिला? त्याची किंमत किती? याची सुद्धा जेपीसी अंतर्गत चौकशी करायची का?,” असा सवाल पीयूष गोयल यांनी उपस्थित केला आहे.

भाजपा प्रवक्ता शहजाद पूनावाल यांनींही खरगेंच्या ‘मफलर’वरून टीकास्त्र डागलं. त्यांनी पंतप्रधान मोदींचं जॅकेट आणि खरगेंच्या ‘मफलर’ची तुलना केली. “पंतप्रधान मोदींनी प्लास्टिकच्या बाटल्यांपासून तयार केलेलं जॅकेट घातलं होतं. तर, मल्लिकार्जुन खरगे हे लुई व्हिटनचं ‘मफलर’ घालून गरीबीवर बोलतात,” असा टोला पूनावालांनी लगावला आहे.

हेही वाचा : “भाजपाच्या डबल इंजिन सरकारला सत्तेबाहेर काढण्याची ताकद एकाच पक्षात” ममता बॅनर्जी म्हणाल्या…

भाजपा कार्यकर्त्या प्रीति गांधी यांनी ट्वीट करत म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घातलेलं जॅकेट हे प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून बनवलं आहे. तर, खरगेंनी घातलेली ‘मफलर’ ४० हजार रुपयांचं आहे,” असं प्रीति गांधींनी सांगितलं. दरम्यान, भाजपाच्या टीकेवर अद्यापही काँग्रेसने कोणतेही उत्तर दिलं नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 14:48 IST