पीटीआय, नवी दिल्ली : एका न्यायाधीशांचा अवमान केल्याप्रकरणी लेखी माफी मागितल्यानंतरही चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून पश्चात्ताप झाल्याचे दाखवा, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले. न्यायालयात हजर राहण्यात काही अडचण आहे का, असा प्रश्नही न्या. सिद्धार्थ मृदुल आणि न्या. तलवंत सिंह यांच्या खंडपीठाने केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांना दिलासा दिल्याप्रकरणी अग्निहोत्री यांनी एका न्यायाधीशांवर ‘पक्षपाती’ असल्याचा आरोप केला होता. त्याप्रकरणी त्यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल झाली होती. त्यानंतर अग्निहोत्री यांनी शपथपत्राद्वारे बिनशर्त माफी मागितली. मात्र यावर न्यायालयाचे समाधान झाले नाही. ‘त्यांना प्रत्यक्ष हजर होऊन माफी मागण्यात काही अडचण आहे का? पश्चात्ताप हा केवळ शपथपत्राद्वारेच व्यक्त होऊ शकत नाही.’ न्यायालयासमोर हजर होणे ही त्रासदायक गोष्ट नाही, असेही न्यायालयाने अग्निहोत्रींच्या वकिलांना सुनावले.  या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ मार्च २०२३ रोजी निश्चित करण्यात आली असून त्या वेळी अग्निहोत्री यांनी स्वत: हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Judge contempt in case delhi high court reprimanded vivek agnihotri ysh
First published on: 07-12-2022 at 00:02 IST