scorecardresearch

‘इंडियन न्यूजपेपर सोसायटी’ची नवी कार्यकारिणी जाहीर ; के राजा प्रसाद रेड्डी अध्यक्षपदी

संस्थेच्या ८३वी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये २०२२-२३ या वर्षांसाठी कार्यकारिणी निवडण्यात आली.

‘इंडियन न्यूजपेपर सोसायटी’ची नवी कार्यकारिणी जाहीर ; के राजा प्रसाद रेड्डी अध्यक्षपदी
के राजा प्रसाद रेड्डी

नवी दिल्ली : देशभरातील वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांच्या प्रकाशकांची शिखर संस्था असलेल्या ‘इंडियन न्यूजपेपर सोसायटी’ची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तेलुगू माध्यमसमूह ‘साक्षी’चे के राजा प्रसाद रेड्डी यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली. मोहित जैन (इकोनॉमिक टाईम्स) यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.

संस्थेच्या ८३वी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये २०२२-२३ या वर्षांसाठी कार्यकारिणी निवडण्यात आली. ‘आज समाज’चे राकेश शर्मा यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ‘अमर उजाला’चे तन्मय महेश्वरी हे मानद खजिनदार तर मेरी पॉल या संस्थेच्या महासचिव असतील. कार्यकारी समितीमध्ये विवेक गोएंका (इंडियन एक्सप्रेस समूह, मुंबई), प्रताप पवार (सकाळ), विजय दर्डा (लोकमत, नागपूर), करण दर्डा (लोकमत, औरंगाबाद), किरण ठाकूर (तरूण भारत, बेळगाव), विलास मराठे (दैनिक हिंदूुस्थान, अमरावती), अनंत नाथ (गृहशोभिका), कुंदन व्यास (व्यापार), शैलेश गुप्ता (मिड-डे), होरसूमजी कामा (बॉम्बे समाचार) यांच्यासह अन्य सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: K raja prasad reddy elected indian newspaper society president zws

ताज्या बातम्या