scorecardresearch

Premium

कबड्डीपटूवर सामूहिक बलात्कार, काँग्रेस नेत्यासह दोघांना अटक

कबड्डीपटूला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

rape, rape in mumbai
पीडित तरुणी ही १९ वर्षाची असून सध्या ती १२ वीत शिकते.

पंजाबमधील लुधियाना येथे कबड्डीपटूला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेसच्या महिला आघाडीतील एका नेत्यासह दोघांना अटक केली आहे.

चंदीगढमध्ये राहणारी १९ वर्षीय तरुणी ही कबड्डीपटू असून ती १२ वीत शिकते. दीड वर्षांपूर्वी तिची खन्ना या गावात राहणा-या अवतार सिंग याच्याशी ओळख झाली होती. अवतारने त्या तरुणीला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करायचे आहे असे सांगितले होते. दिवाळीची खरेदी करण्याच्या बहाण्याने त्याने पीडित तरुणीला खन्ना गावात बोलावले. यानंतर पीडितेला घेऊन अवतार तिला एका घरात घेऊन गेला. तिथे अवतारचा भाऊ निर्मल आणि शेहनाझ उपस्थित होते. चहापान झाल्यावर अवतार आणि त्याचा मित्र निर्मल पीडित तरुणीला घर दाखवण्याच्या बहाण्याने दुस-या खोलीमध्ये नेले. तिथे गेल्यावर दोघांनी तिला बंदुकीचा धाक दाखवला आणि तिच्यावर अत्याचार केले. या संपूर्ण घटनेदरम्यान शेहनाझ घरातच होती आणि पण ती पीडितेच्या मदतीला आली नाही. शेवटी कशीबशी या तरुणीने स्वतःची नराधमाच्या तावडीतून सुटका केली आणि बस स्थानक गाठले. तिथून सिरहिंदला परतल्यावर तिने एका मित्राला घडलेला प्रकार सांगितला. यानंतर दोघांनी स्थानिक पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त
The son told his mother a strange reason for not studying
अभ्यास न करण्यासाठी मुलानं आईला सांगितलं भन्नाट कारण; Video एकदा पाहाच

निर्मल हा खन्ना गावातील माजी सरपंच असून शेहनाज ही काँग्रेसच्या महिला आघाडीत पदाधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. बलात्कार आणि कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यातील अवतार आणि निर्मलला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून शेहनाझला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kabaddi player gangraped in punjab three arrested

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×