काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; परदेशी नागरिकांना सावधानतेचा इशारा

आय़सिसच्या मानवी बॉम्बच्या माध्यमातून हा हल्ला होऊ शकतो, असंही सांगण्यात आलं आहे

kabul Evacuation
सर्वच देश आपापल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी अफगाणिस्तानातल्या काबूल विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. या भागात हदशतवादी हल्ला होण्याचा शक्यता वर्तवली जात आहे. विमानतळाबाहेर जमलेल्या नागरिकांनी तात्काळ इतर ठिकाणी, सुरक्षित जागी जावं अशा सूचना जारी कऱण्यात आल्या आहेत.

३१ ऑगस्टच्या आत बचावकार्य पूर्ण करण्याचं लक्ष्य असतानाच त्याच्या काही दिवस आधी हा इशारा देण्यात आला आहे. तालिबानने देश ताब्यात घेतल्यापासून आत्तापर्यंत ८० हजाराहून अधिक नागरिकांना काबूल विमानतळावरुन बाहेर काढण्यात आलं आहे. तर विमानतळावर झालेल्या घाईगर्दीमुळे ८ जणांचा जीव गेल्याचंही इंडिया टुडेने आपल्या वृत्तात नमूद केलं आहे.

द गार्डियनमधील एका अहवालानुसार, ब्रिटनने दहशतवादी हल्ल्याचा सर्वाधिक धोका असल्याचं सांगितलं आहे. आय़सिसच्या मानवी बॉम्बच्या माध्यमातून हा हल्ला होऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं आहे. तर अमेरिकेनेही आपल्या अफगाणिस्तानातील देशवासीयांना विमानतळावर अथवा आसपास जमा न होण्याच्या सूचना केल्या आहेत. जे कोणी विमानतळाच्या आसपास आहेत, त्यांनी तात्काळ बाजूला व्हावे असा इशाराही त्यांनी दिला आहे. तर ऑस्ट्रेलियाकडूनही धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या अफगाणिस्तानातील परिस्थिती अत्यंत धोकादायक असून गर्दीच्या ठिकाणी हिंसाचार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तालिबानने काबूल विमानतळ परिसरात आपलं वर्चस्व अधिक मजबूत केलं आहे. त्यानंतर ह्या सूचना विविध देशांकडून देण्यात आल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kabul airport terror attack threat evacuation uk us australia vsk

ताज्या बातम्या