scorecardresearch

Premium

MP Election : “मी आता मोठा नेता झालोय, लोकांच्या हातापाया पडायला…”, भाजपा उमेदवाराचं वक्तव्य चर्चेत

2023 Madhya Pradesh Legislative Assembly election : भाजपा उमेदवारांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.

kailash vijayvargiya 1
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. (PC : ANI)

मध्य प्रदेशात सत्ता राखण्यासाठी भाजपाने सगळी ताकद एकवटली आहे. पक्षाने सोमवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत तीन केंद्रीय मंत्री तसेच चार खासदार आहेत. राज्यातील काँग्रेसचं आव्हान पाहता, ज्येष्ठ नेत्यांना भाजपाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यापैकी नरेंद्रसिंह तोमर आणि फग्गनसिंह कुलस्ते हे गेल्या वेळी म्हणजेच २०१८ मध्ये काँग्रेसने जिंकलेल्या जागेवर उमेदवार आहेत. तर चारपैकी तीन खासदार हे काँग्रेसचे विद्यमान आमदार असलेल्या ठिकाणी लढत आहेत. त्याचबरोबर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनाही भाजपाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

विधानसभेचं तिकीट मिळाल्यानंतर कैलास विजयवर्गीय यांनी त्यांच्या इंदूर-१ या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचारादरम्यान त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात ते म्हणाले, मी आणि तुम्ही सगळे कार्यकर्ते मिळून विकासाच्या बाबतीत या विधानसभा क्षेत्राला एक नंबर बनवूया. मी तुम्हाला आश्वस्त करतो की मला जितका वेळ मिळेल तो देईन आणि मी इथे येईन.

Tejasvi Surya commented on INDIA
“हे तर साप अन्…”, भाजपा खासदाराची ‘इंडिया’ आघाडीवर टीका
Madhya Pradesh Elections 2023 bjp vs congress
“माझ्या बहिणींनो तुम्हाला…”, मुख्यमंत्री शिवराज चौहान यांची महिला मतदारांना भावनिक साद
rahul gandhi kharge meeting
निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज!; पाच राज्यांत यशाचा कार्यकारी समितीला विश्वास 
yashomati thakur will file defamation case against navneet rana over money allegation
लोकसभा निवडणूक अन् कडक नोटा… नवनीत राणांच्या आरोपावर यशोमती ठाकूर यांचा अब्रुनुकसानीचा उतारा; प्रकरण काय? वाचा…

कैलाश विजयवर्गीय म्हणाले, मी जितक्या घरांसमोर जाऊ शकतो तितक्या घरी जाण्याचा प्रयत्न करेन. परंतु, जिथे मी जाऊ शकणार नाही तिथे पोहोचण्याची जबाबदारी तुमची. या विधानसभा क्षेत्रातलं एकही घर सुटलं नाही पाहिजे. प्रत्येक घरात जा, प्रत्येक घरात तुम्ही कैलास विजयवर्गीय बनून जा. लोकांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्या. या मतदारसंघात आपला रेकॉर्डब्रेक विजय झाला पाहिजे.

भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय म्हणाले, खरंतर निवडणूक लढण्याची माझी इच्छा नाही. मला निवडणूक लढण्याची एक टक्कासुद्धा इच्छा नाही. आपली मानसिकता आधीच तयार झालेली असते. आम्हाला काय..जायचं आणि भाषण करायचं…आता मी मोठा नेता झालोय, हातापाया पडाययला आता कुठे जाणार?… सांगितलं जाईल तिथं जायचं, भाषण करायचं आणि निघून जायचं…मी असाच विचार केला होता..तशी योजना बनवली होती…रोज आठ सभा घ्यायच्या..पाच सभा हेलिकॉप्टरमधून आणि तीन कारमधून…परंतु तुम्ही काहीही विचार करा, पण जे ईश्वराच्या मनात आहे तेच होतं.

हे ही वाचा >> “मला गोपीनाथ मुंडेंपेक्षा जास्त संघर्ष करावा लागतोय”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

भाजपा नेते म्हणाले, आता देवाला वाटतंय मी पुन्हा उमेदवार बनून जनतेत जावं. खरंतर मला विश्वास बसत नाहीये की मी निवडणूक लढतोय. मी खरं सांगतोय. मला वाटतंच नाही की मला निवडणुकीचं तिकीट मिळालंय आणि मी उमेदवार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kailash vijayvargiya first reaction after getting ticket for mp election says i have become big leader asc

First published on: 27-09-2023 at 14:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×