कलबुर्गींचा खून करणाऱ्याची हत्या? रेखाचित्रावरून संशय

मृत पावलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

kalburgi murder case, कलबुर्गी हत्या
व्यक्तीने गोळ्या घालून या व्यक्तीचा खून केल्याचे सकृतदर्शनी पोलीसांना आढळले आहे. मृत पावलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

पुरोगामी कन्नड विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर कर्नाटक पोलिसांनी जारी केलेल्या संशयिताच्या रेखाचित्राशी मिळता जुळता चेहरा असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह बुधवारी बेळगावमधील खानापूरच्या जंगलात आढळला. अज्ञात व्यक्तीने गोळ्या घालून या व्यक्तीचा खून केल्याचे सकृतदर्शनी पोलीसांना आढळले आहे. मृत पावलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्नाटक पोलीसांचे विशेष पथक बंगळुरूहून बेळगावमध्ये दाखल झाले आहे.
बेळगावजवळ असलेल्या खानापूरच्या जंगलात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना एक मृतदेह आढळला. त्यानंतर या प्रकरणी बेळगाव पोलीसांना माहिती देण्यात आली. पोलीसांनी मृतदेह बघितल्यावर कलबुर्गी यांच्या हत्येनंतर जारी करण्यात आलेल्या रेखाचित्रामधील संशयिताच्या चेहऱ्याशी तो मिळता जुळता असल्याचे स्पष्ट झाले. छातीवर गोळ्या झाडून या व्यक्तीचा अज्ञाताने खून केल्याचे पोलीसांनी सांगितले.
कलबुर्गी यांची ऑगस्टमध्ये धारवाड येथील त्यांच्या राहत्या घरी दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर कर्नाटक सरकारने या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे देण्याचा निर्णय घेतला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kalburgi murder case one dead body found in khanapur forest